शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

एस. जयशंकर आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार! पुढील महिन्यात संपणार कार्यकाळ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 09:29 IST

गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) आज गुजरातच्या गांधीनगरमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी ते रविवारी अहमदाबादला पोहोचले आहेत. दरम्यान, राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये गुजरातमधील तीन जागांचा समावेश असून त्यापैकी एका जागेसाठी एस. जयशंकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपत आहे.

एस. जयशंकर यांच्याशिवाय गुजरातमधील राज्यसभा खासदार दिनेश जेमलभाई अनावडिया आणि लोखंडवाला जुगल सिंह यांचा कार्यकाळही 18 ऑगस्ट रोजी संपत आहे. दुसरीकडे, काँग्रेसने गुजरात राज्यसभा निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले आहे. विधानसभेत त्यांच्याकडे फारशा जागा नसल्यामुळे काँग्रेसने यावेळी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष मनीष दोशी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले आकडे मिळाले नाहीत, त्यामुळे यावेळी आगामी राज्यसभा निवडणुकीत पक्ष सहभागी होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यसभेत जुलै आणि ऑगस्टमध्ये 10 जागा रिक्त होत आहेत. ज्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह गोव्यातील भाजपचे सदस्य विनय डी. तेंडुलकर, गुजरातमधील जुगलसिंह लोखंडवाला आणि दिनेशचंद अनावडिया, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओब्रायन, डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि सुखेंदू शेखर राय यांच्यासह काँग्रेस सदस्य प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपत आहे.

24 जुलैला मतदान होणार दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत उतरण्यासाठी उमेदवार 13 जुलैपर्यंत अर्ज दाखल करू शकतात आणि तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 17 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर 24 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. दरम्यान, सध्या राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपचे 93 सदस्य आहेत. काँग्रेस 31 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीएमसीचे 12 खासदार आहेत.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकGujaratगुजरात