शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलच्या निष्कर्षात व्यापक तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 04:53 IST

अंदाजात विरोधाभास : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला किमान ३४ जागा मिळण्याचा अंदाज

- हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सर्वच एक्झिट पोलने देशात पुन्हा एनडीएच्या सरकारला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे, तर महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युतीला ३३ अथवा त्यापेक्षा अधिक जागा मिळतील, असे अंदाज व्यक्त केले आहेत; पण बारकाईने पाहिले, तर या निष्कर्षातील विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो.

इंडिया टुडे- अ‍ॅक्सिस, टुडेज चाणक्य, न्यूज १८ या तिघांच्या एक्झिट पोलने एनडीएला ३३६ ते ३५० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे; पण त्यांनी केलेले दावे राज्यवार पाहिले, तर त्यातील अस्पष्टता दिसून येते. उदाहरणार्थ, न्यूज १८ ने भाजप- शिवसेनेला ४२-४५ जागा दिल्या आहेत. इंडिया टुडे- अ‍ॅक्सिसने चार जागा कमी दिल्या आहेत. टुडेज् चाणक्यने ३८ जागा सांगितल्या आहेत. अन्य एक्झिट पोलचे यावर एकमत आहे की, एनडीएला किमान ३४ जागा मिळतील. एक्झिट पोलने काँग्रेस- राष्ट्रवादीला ४ ते १४ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

इंडिया टुडे अ‍ॅक्सिसच्या प्रदीप गुप्ता यांच्याकडून प्रतिसाद मिळविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. तथापि, ते दूरचित्रवाणी वाहिनीवर त्यांच्या निष्कर्षाची कारणमीमांसा करीत होते. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या न्यूज १८ टीव्ही नेटवर्कसाठी आयपीएसओएसने काम केलेले नव्हते. गंमत म्हणजे राजीव शुक्ला यांचा न्यूज २४ गु्रपदेखील मुकेश अंबानी यांच्या जवळचा समजला जातो. जनमत चाचण्या करणाऱ्या या तिघांना वगळता इतर सात जणांनी रालोआला २७७ ते ३०६ जागा मिळतील, असे म्हटले आहे.उत्तरप्रदेशबाबत संभ्रमअत्यंत महत्त्वाच्या अशा उत्तर प्रदेश राज्यात तीव्र मतभेद समोर आले आहेत. उत्तर प्रदेशात जनमत चाचण्या करणाºया तिघांनी रालोआला लोकसभेच्या ६० ते ६८ जागा दिल्या आहेत; परंतु इतर सात अंदाज वर्तवणाऱ्यांनी रालोआला ३३ ते ५८ जागा दिल्या आहेत.

ओदिशा राज्यातील कल सांगताना या तीन जनमत चाचण्यांचे अंदाज सांगणाºयांतील मतभेद खूपच स्पष्ट झाले. टुडेज चाणक्यने जर आज १४ जागा भाजपला ओदिशात दिल्या, तर इंडिया टुडे अ‍ॅक्सिसने तेथेच भाजपला शून्य जागा दिल्या, तर न्यूज एटीनने भाजपला ६ ते ८ जागा दिल्या.

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९