शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मागणी अर्जाला मुदतवाढ

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

स्नेहलता कोल्हे यांची माहिती

स्नेहलता कोल्हे यांची माहिती
कोपरगाव : कोपरगाव व राहाता तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी पाणी मागणी अर्ज भरलेले नाहीत, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्याचा आदेश जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे़ त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली़
कोपरगाव व राहाता तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने येथील फळबागा, ऊस, खरीप पिके धोक्यात आली आहेत़ तेव्हा गोदावरी कालव्यांना तातडीने पिण्याचे पाण्याबरोबरच शेती पाण्याचे आर्वतन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती़ त्यावर त्यांनी हा आदेश काढल्याचे कोल्हे यांनी सांगितले़
गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी, शेततळी, बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी आ़ स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे बुधवारच्या भेटीत केली़ त्यावेळी मंत्री महाजन यांनी पाटबंधारे खात्याचे अधिकारी, सचिव व मुख्य अभियंता यांच्याबरोबर चर्चा करून या मागणीस तत्वत: माण्यता दिली़ नाशिक पाटबंधारे खात्याने शेतकर्‍यांना पाणी मागणीचे अर्ज भरून देण्यासाठी अवघ्या दोन दिवसांची मुदत दिली होती़ त्यामुळे बहुसंख्य लाभधारक शेतकरी या संधीपासून वंचित राहिलेले होते़ पाणी मागणीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना पाणी मिळणार आहे, असे आ़ कोल्हे यांनी सांगितले़
चौकट-
रविवार पासून आवर्तन
गोदावरी कालव्यांना पिण्याच्या पाण्याबरोबच शेती पाण्याचे आवर्तन रविवार दि़ २ ऑगस्ट पासून सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मोहन बिरासदार यांना शुक्रवारी दिले़