शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून कायमचे हद्दपार करा : ममता बॅनर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:49 IST

आता जनतेनेच पंतप्रधानांच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी

नागराकाटा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून हद्दपार करा तसेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी, असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी काढले.

येथील प्रचारसभेत त्या म्हणाल्या, मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील साडेचार वर्षे विदेश दौरे करण्यातच घालविले. त्यांना देशातील शेतकरी, मध्यमवर्गाकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नव्हता. निवडणुका तोंडावर आल्यानंतर मोदी आता प्रत्येकाला धमकावत आहेत आणि सर्रास खोटा प्रचार करत आहेत. धडधडीत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदी नक्कीच प्रथम क्रमांक पटकावतील. त्या पुढे म्हणाल्या, मोदी यांनी खोटे बोलू नये म्हणून आता जनतेनेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी. देशाच्या भल्यासाठी त्यांना केवळ पंतप्रधानपदावरूनच नव्हेतर, राजकारणातूनही हद्दपार करायला हवे.

माझ्यामुळे ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेस यांची घाबरगुंडी उडाली आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुचबिहारमधील प्रचारसभेत रविवारी केले होते. त्यासंदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्हाला भीती दाखविण्याचा प्रयत्न केलात, तर ती तुमची सर्वांत मोठी घोडचूक ठरेल. देशातील शेतकरी जेव्हा आत्महत्या करत होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते?नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही माणसे मरण पावली, कोट्यवधी लोकांच्या हातातील रोजगार गेला त्या वेळी मोदी काय करत होते, याचे उत्तर पंतप्रधानांनीच दिले पाहिजे. (वृत्तसंस्था)गतिरोधक दीदीकेंद्राच्या विकास योजना पश्चिम बंगालमध्ये राबविण्यात अडथळे आणणाऱ्या ममता बॅनर्जी स्पीडब्रेकर (गतिरोधक) दीदी आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी सातत्याने करत आहेत. बॅनर्जी यांच्यामुळे या राज्यातील जनतेला केंद्रीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागते, असेही त्यांनी म्हटले होते. या उद्गारांमुळे ममता खूप संतापल्या असून त्याही मोदींवर पलटवार करत आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019