शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

निर्यात क्षेत्रात २०२२ पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:10 IST

मोदी यांचा परदेशातील भारतीय दूतावासांच्या प्रमुखांशी, व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

मुंबई : कोरोनाने थैमान घातले असतानाच भविष्यातील आर्थिक  आणि व्यापार क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत निर्यात क्षेत्रात २०२२ पर्यंत ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्याचे निर्धारित केले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि परराष्ट्र व्यवहारमंत्रीदेखील या संवादसत्रात सहभागी झाले होते, तसेच विविध विभागांचे सचिव, राज्य सरकारांचे अधिकारी, व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील मान्यवरही यावेळी उपस्थित होते.या बैठकीला जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, औषध, रसायन आणि मत्स्य क्षेत्राशी निगडित वाणिज्य कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशभरातील निर्यातदारदेखील उपस्थित होते. माहिती - तंत्रज्ञान, जेम्स अँड ज्वेलरी आणि औषध क्षेत्रातील चर्चेवर यात प्रामुख्याने भर देण्यात आला. १४२ पेक्षा अधिक देशांच्या भारतीय दूतावासांनी उपस्थिती दर्शविलेल्या बैठकीत संबंधित देशात व्यापाराच्या काय संधी आहेत, याची माहिती मांडली गेली. यात बांगलादेश, युकेसारख्या देशांचा समावेश होता. यावेळी भारतातून विकसित होत असलेले ड्रॅगन फळ ब्रिटनमध्ये कसे निर्यात करता येईल, यावर भर देण्यात आला. गुजरातमधील कच्छमध्ये ड्रॅगन फळाचे उत्पादन घेतले जात असल्याचे व्यापारी वर्गाने लक्षात आणून दिले.४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे आपापल्या देशात काय करता येईल, याचा अहवाल सादर करणार असल्याचे दूतावासांनी नमूद केले. शिवाय बहुतांश शिष्टमंडळे विविध राज्यांत दाखल होत दोन देशांमध्ये काय संभाव्य व्यापार करता येऊ शकतो, याची माहिती घेणार आहेत. सर्व विभाग, सर्व अधिकारी, देशभरातील उद्योगपतींचे सहकार्य यासाठी होत आहे. जगभरात कोरोनाचे थैमान असल्याने वाहतुकीवर गदा आली. याच काळात चीनमध्ये आयातीवर बंदी आली आहे. भारत-चीन सीमा वाद उफाळून आला होता. तरीही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात येत आहे. असे असले तरी ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्यावर बैठकीत जोर देण्यात आला.७५ अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठणार - किरिट भन्साळी कोरोना काळातही जेम्स अँड ज्वेलरी, डायमंड क्षेत्राने उत्तम काम केले असून, या क्षेत्राला हे वर्ष सुगीचे ठरले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आम्ही अधिकाधिक लक्ष्य निर्धारित करणार आहोत, असे या बैठकीच्या निमित्ताने हिरे व्यापारी किरिट भन्साळी यांनी सांगितले.जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रासाठी ४४ अब्ज एवढे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीचा विचार करता विशेषत: अमेरिका आणि चीनकडे पाहता पंतप्रधानांचे व्हिजन आम्ही नक्कीच गाठू, असा विश्वास असल्याचे सांगत पाच वर्षांत जेम्स अँड ज्वेलरीचे ७५ अब्ज डॉलर्सचे गाठण्याचे लक्ष्य असल्याचे किरिट भन्साळी यांनी सांगितले.