शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून वर्षभरात सव्वाचार कोटी टन कृषी मालाची निर्यात; गहू निर्यातीचा विक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:55 IST

१ लाख ८४ हजार कोटींची उलाढाल : तांदळाची सर्वाधिक निर्यात

नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे आर्थिक वर्षात कृषी मालाची निर्यात वाढली आहे. २०२१-२२ मध्ये देशातून तब्बल ४ कोटी २७ लाख ६३८५६ टन कृषी माल निर्यात झाला असून, १८ लाख ४७ हजार ७६९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तांदळाची निर्यात सर्वाधिक असून, वर्षभरात गहू निर्यातीमध्ये विक्रमी तीनपट वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम भाव मिळावा व कृषी व्यापारातून जास्तीत जास्त विदेशी मुद्रा प्राप्त व्हावी यासाठी शासनाकडून निर्यातीला प्रोत्साहन दिले जात आहे. कोरोनामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात अपेक्षित निर्यात झाली नव्हती. २०२१-२२ या वर्षात कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे निर्यातीला गती मिळाली होती. वर्षभरात फळे, भाजीपाला, अन्नधान्य, प्रक्रिया केलेल्या वस्तू १०० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या. 

वर्षभरात तांदळाची सर्वाधिक निर्यात झाली आहे. १ कोटी ७२ लाख ६२ हजार २३५ टन बिगरबासमती व २९८४९ टन बासमती  तांदळाची निर्यात झाली. दोन्ही मिळून ७२ हजार ६८ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. 

वर्षभरात गहू निर्यातीमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात २० लाख ८८ हजार ४८७ टन निर्यात झाली होती. २०२१-२२ मध्ये तब्बल ७२ लाख ३९ हजार ३६६ टन निर्यात झाली आहे. गहू निर्यातीची उलाढाल ४०३७ कोटींवरून १५ हजार ८४० कोटी झाली आहे. रशिया व युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय गव्हाला मागणी वाढली आहे. भारतीय शेतीमालाला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. 

कृषी माल व प्रक्रिया केलेल्या वस्तूंना जगभरातून मागणी वाढली आहे. आर्थिक वर्षात रशिया व युक्रेन युद्धामुळे गव्हाची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. - भीमजी भानुशाली, सचिव - द  ग्रेन, राईस व  ऑईलसीड मर्चंट असो.