शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

यवतमाळ व अकोला वैद्यकीय महाविद्यालयांबद्दल भूमिका स्पष्ट करा

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

हायकोर्टाचे निर्देश : शासनाला मागितले सात दिवसांत उत्तर

हायकोर्टाचे निर्देश : शासनाला मागितले सात दिवसांत उत्तर

नागपूर : यवतमाळ आणि अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात शासनाला सात दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.
दोन्ही रुग्णालयांचा निश्चित कालावधीत विकास करायचा आहे काय आणि निधी उपलब्ध करून द्यायचा आहे किंवा नाही अशी विचारणा न्यायालयाने राज्य शासनाचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांना केली आहे. यावर सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर योग्य तो आदेश देण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
२०१३ मध्ये केंद्र शासनाने १० वर्षे पूर्ण झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ५० जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय केवळ एक वर्षासाठी मर्यादित होता. यानंतर अतिरिक्त जागा कायम ठेवण्याची बाब वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर अवलंबून होती. या निर्णयाचा लाभ यवतमाळ व अकोला वैद्यकीय महाविद्यालयांना मिळाला होता. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने पुन्हा दोन्ही महाविद्यालयांचे निरीक्षण केले. त्यात आवश्यक सुविधांचा अभाव आढळून आल्यामुळे कौन्सिलने गेल्या ७ मे रोजी केंद्र शासनाला पत्र लिहून दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० जागा कमी करण्याची व संलग्नता काढून घेण्याची शिफारस केली होती. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही महाविद्यालयांच्या जागा कायम ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही महाविद्यालयांचा निश्चित कालावधीत विकास करण्याची हमी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला देण्याचे निर्देश शासनास दिले होते.
तत्पूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाकरिता १२६ कोटी, तर अकोला वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासाकरिता ७० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद करून निश्चित कालावधीत विकासकामे पूर्ण करण्याची ग्वाही प्रतिज्ञापत्रावर दिली होती. यानंतर सहा महिन्यांवर कालावधी लोटूनही विकासकामांना सुरुवात झालेली नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. न्यायालयीन मित्र ॲड. जुगलकिशोर गिल्डा यांनी दोन्ही महाविद्यालयांच्या परिस्थितीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. शासनातर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.