शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

अल निनो प्रभावहीन : ऑगस्ट कोरडाच जाण्याची भीतीपुणे : सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असून ऑगस्ट महिन्याचे पुढचे १० दिवस कोरडेच जातील, अशी भीती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात अल निनो घटक प्रभावहीन ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आगामी दहा दिवस राज्यात पाऊस होण्याची चिन्हे नसून ...


अल निनो प्रभावहीन : ऑगस्ट कोरडाच जाण्याची भीती

पुणे : सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा असून ऑगस्ट महिन्याचे पुढचे १० दिवस कोरडेच जातील, अशी भीती ज्येष्ठ हवामानाशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात अल निनो घटक प्रभावहीन ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी दहा दिवस राज्यात पाऊस होण्याची चिन्हे नसून त्यामुळे सर्व पिकांना ताण सहन करावा लागेल. जनावरांच्या चार्‍याची समस्या निर्माण होऊ शकेल, मात्र सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस होईल, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साबळे म्हणाले, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात खंड पडेल, हा अंदाज खरा ठरला. आगामी दहा दिवस पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे खरिपाच्या सर्व पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागेल. जिरायती भागात जेथे उशिरा उगवण झाली आहे, त्या पिकांना धोका उद्भवेल. सध्याचा चारा पुढच्या दहा दिवसांत संपून नव्या चार्‍याची उगवण होईपर्यंत जनावरांच्या चार्‍याचा तुटवडा होऊ शकेल. पिण्याच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन काही ठिकाणी समस्या उद्भवू शकले, असेही ते म्हणाले.
२७ किंवा २८ ऑगस्टपासून पुन्हा पावसाला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल. १५ ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस होईल. त्याचा फायदा रब्बीच्या पेरण्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.
हवामानशास्त्र विभागाने पावसात दहा टक्के घट होईल, असे म्हटले आहे. मात्र तो जून ते ऑगस्ट दरम्यानचा अंदाज आहे. अल निनोचा परिणाम पुढच्या पावसावर दिसेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, मला माझ्या अभ्यासानुसार अल निनोचा परिणाम जाणवणार नाही, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
-------------------