शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश; शुल्कवाढीचा निर्णय मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 18:21 IST

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शुल्कवाढीचा निर्णय प्रशासनाकडून मागे

नवी दिल्ली: वसतिगृहाच्या वाढीव शुल्काविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आलं आहे. विद्यापीठ प्रशासनानं शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला आहे. शिक्षण सचिव आर. सुब्रमण्यन यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. जेएनयूच्या प्रशासकीय समितीनं वसतिगृहाच्या शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतल्याचं सुब्रमण्यन यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करुन पुन्हा वर्गांमध्ये जावं, असं आवाहन त्यांनी केलं.विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यकारी समितीनं जेएनयूच्या बाहेर बैठक घेतली. मात्र बैठकीचं ठिकाण बदलल्याची कोणतीही माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, असा आक्षेप जेनएयूच्या शिक्षण संघटनेनं घेतला. आयटीओच्या जवळ असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजमध्ये जेएनयूच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली.आमचे अनेक मुद्दे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचं जेएनयूटीएचे अध्यक्ष डी. के. लोबियाल यांनी म्हटलं. 'पदोन्नतीसारखे विषय बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्हाला ते मांडायचे आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून शैक्षणिक कार्यकारी समितीची बैठक एक तर रद्द केली जाते किंवा दुसऱ्या ठिकाणी तिचं आयोजन केलं जातं. आम्ही याचा निषेध करतो. कुलगुरु अशा प्रकारे विद्यापीठ चालवू शकत नाहीत,' असं लोबियाल म्हणाले.