शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Assembly Election: ममतांच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; अधिकारींच्या निकटवर्तीयाला फोन करून मदत मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 05:52 IST

भाजपचा दावा, भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली व त्यांना क्लिप सोपविली.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्या कथित ऑडियो क्लिपमुळे खळबळ माजली आहे. नंदीग्राम येथे ममता यांच्याविरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय असलेले प्रलय पाल यांना ममता यांनी फोन लावला व जिंकण्यास मदत करण्यासाठी मदत मागितल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली व त्यांना क्लिप सोपविली. विधानसभा निवडणुकांना प्रभावित करण्यासाठी ममता आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप भाजपने लावला आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूलने या ऑडियो क्लिपवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ही क्लिप खरी असल्याचे स्पष्ट झालेले नाही. प्रलय पाल हे तृणमूलचे माजी पदाधिकारी होते. जर बॅनर्जी त्यांना परत पक्षात परत येण्यासंदर्भात म्हणत असतील, तर त्यात चुकीचे काय आहे, असे तृणमूलचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी सांगितले.  

काय आहे क्लिपमध्ये ?पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी पाल यांना बॅनर्जी यांनी संपर्क केल्याचा दावा भाजपने केला आहे. नंदीग्राममध्ये विजय मिळविण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे.  तुमची काही नाराजी आहे, हे मला माहिती आहे. मात्र, यातील बहुतांश तक्रारी अधिकारी कुटुंबामुळे आहेत. त्यांनी मला कधी नंदीग्राम किंवा पूर्व मिदनापूरमध्ये येऊ दिले नाही. यानंतर मी या बाबींची काळजी घेईल, असे ऑडियो क्लिपमध्ये ऐकू येत आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१