शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अतिप्रमाणात ‘सिटी स्कॅन’ धोकादायक, आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रमुखांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 06:36 IST

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रमुखांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाच्या धास्तीने वारंवार ‘सिटी स्कॅन’ करणाऱ्या बाधितांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. एकदा ‘सिटी स्कॅन’ करणे ३०० ते ४०० वेळा छातीची क्ष-किरण तपासणी करण्यासारखे असून, त्यामुळे भविष्यात कर्करोग होण्याचा धोका उद‌्भवतो, असे सांगत डॉ. गुलेरिया यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाकहरामुळे भांबावलेली जनता कोरोनाची थोडी जरी लक्षणे आढळली तरी ‘सिटी स्कॅन’ करून घेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी वरीलप्रमाणे इशारा दिला. ते म्हणाले की, ‘सिटी स्कॅन’ आणि बायोमार्कर्स या सुविधांचा गैरवापर होत असून, ज्यांना  कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांना या चाचण्या करण्याची काहीही गरज नाही. ज्या बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, ज्यांच्यात लक्षणे तीव्र आहेत अशांसाठीच ‘सिटी स्कॅन’ योग्य ठरते. 

रेमडेसिविर आणि स्टेरॉइडपासून सावधडॉ. गुलेरिया यांनी रेमडेसिविर आणि स्टेरॉइड्ससंदर्भातही खबरदारी बाळगण्याची सूचना यावेळी केली. ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग अतिप्रमाणात झाला असेल. फुप्फुसांपर्यंत संसर्ग झाला असेल तरच या दोन्ही उपचारांची गरज भासते. कोरोनाबाधितांच्या उपचारांत पहिल्याच टप्प्यात रेमडेसिविर आणि स्टेरॉइड्स दिल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

कोरोनाविरोधात आता वैद्यकीय शाखेचे विद्यार्थीलढाईला बळकटी मिळावी यासाठी आता वैद्यकीय शाखेच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या सेवा घेण्यात येणार असून वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेलाही चार महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. तसेच नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांचीही कोरोनालढ्यात मदत घेण्यात येणार आहे. वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका तसेच वैद्यक क्षेत्रातील अनेक रिक्त पदे येत्या ४५ दिवसांत भरणार आहेत. कोरोनाबाधितांच्या उपचारांत पहिल्याच टप्प्यात रेमडेसिविर आणि स्टेरॉइड्स दिल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.

क्ष-किरण तपासणी करा nएक ‘सिटी स्कॅन’ ३०० ते ४०० क्ष-किरण तपासण्यांसमान असून, त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. तेव्हा ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांनी ‘सिटी स्कॅन’ न करता छातीची क्ष-किरण तपासणी करावी. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांच्या रक्त तपासणीचीही काहीच गरज नाही. nऑक्सिजन पातळी चांगली असलेल्यांनी घरीच विलगीकरणात राहून पथ्य पाळल्यास कोरोना बरा होतो, असे सांगत ‘सिटी स्कॅन’पासून दूर राहण्याचे आवाहन डॉ. गुलेरिया यांनी केले.