शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

EVM-VVPAT पास की नापास? मतांच्या पडताळणीबाबत समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 12:21 IST

17 व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीन वरून मोठा गोंधळ झाला होता. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पडताळणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीन वरून मोठा गोंधळ झाला होता. तसेच संशयाला वाव राहू नये म्हणून 50 टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांच्या पडताळणीबाबत मोठी माहिती समोर आली असून, संपूर्ण देशभरात करण्यात आलेल्या मतांच्या पडताळणीत केवळ 0.0004%  ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांमध्ये फरक असल्याचे निष्पन्न झाले आहे. संपूर्ण देशात केवळ 8 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये अंतर असल्याचे दिसून आले. मेघालयमधील शिलाँग मतदारसंघातील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये 34 मतांचे अंतर दिसून आले. देशभरात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील हा सर्वात मोठा फरक ठरला आहे.  आंध्र प्रदेशमधील राजमपेट मतदान  केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये सात मतांचा फरक दिसून आला. हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील एका मतदान केंद्रातील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एका मताचा फरक दिसून आला.  राजस्थानमधील चित्तौडगड आणि पाली लोकसभा मतदारसंघातील एकेका मतदान केंद्रात इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये एका मताचा फरक दिसून आला. मणिपूरमध्ये दोन ठिकाणी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक दिसून आला. यातील एका ठिकाणी एक तर दुसऱ्या ठिकाणी दोन मतांचा फरक होता.  दरम्यान, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक का दिसून आला याचा तपास करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विविध राज्यांमधील मुख्य निवडणूक अधिकारी निवडणुकीसंदर्भात उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांची माहिती गोळा करत आहेत. '' आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार आतापर्यंत निवडणूक निकालांना आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झालेल्या नाहीत. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची जुळणी न झाल्याची आठ प्रकरणे समोर आली आहेत. लवकरच आम्ही त्याचा तपास करू.'' असे निवडणूक आयोगामधील एका अधिकाऱ्याने सांगितले.  निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकलनानुसा एकूण 20 हजार 687 इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ 0.0004 टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांमध्ये फरक दिसून आला. दरम्यान, काही मानवी चुकांमुळे हा प्रकार घडला, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. तसेच मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी इव्हीएममधून मॉक पोलचा डेटा डिलीट न केल्याने मतामध्ये फरक पडला असावा, असा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे.   

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVVPATव्हीव्हीपीएटीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारण