हैदराबाद : दोन वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने हिमालयातील एव्हरेस्ट शिखर खरेच खचले आहे का, हे ठरविण्यासाठी जगातील या सर्वात उंच पर्वत शिखराच्या उंचीची सर्व्हे आॅफ इंडियाकडून नव्याने मोजदाद करण्यात येणार आहे.एव्हरेस्ट शिखराची उंची ८,८४८ मीटर (२९,०२८ फूट) एवढी असल्याचे अधिकृतपणे मानले जाते. येथे झालेल्या ‘जिओस्पॅशियल वर्ल्ड फोरम’च्या बैठकीसाठी आले असता भारताचे सर्व्हेअर जनर स्वर्ण सुब्बा राव यांनी सांगितले की, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी सर्व्हे आॅफ इंडियाची एक अभियान तुकडी येत्या दोन महिन्यांत रवाना होईल.सुब्बाराव म्हणाले की, सर्व्हे आॅफ इंडियाने सन १८५५ मध्ये एव्हरेस्टची नेमकी उंची २९,०२८ फूट असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अनेकांनी उंची मोजली. पण सर्व्हे आॅफ इंडियाने ठरविलेली उंचीच आजही अचूक मानली जाते. (वृत्तसंस्था)
एव्हरेस्टची उंची नव्याने मोजणार
By admin | Updated: January 26, 2017 01:45 IST