चंदिगड : पंजाबमध्ये नव्या अराजकीय मंचाच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपाचा बुधवारी औपचारिकरीत्या राजीनामा दिला. १८ जुलै रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग केलेल्या सिद्धूंनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला. त्यांच्या पत्नी नजज्योत कौर यांनीही राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.‘मी याद्वारे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. प्रदीर्घ संबंध (भाजपसोबत), वेदनादायी निर्णय...माझी पत्नी, मुले आणि पक्ष नाही तर माझ्यासाठी सर्वात आधी पंजाब महत्त्वाचा आहे. पंजाब, पंजाबियत आणि प्रत्येक पंजाबी विजयी व्हायलाच हवा, असे सिद्धू यांनी शाह यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. सिद्धूंनी भाजपचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या पत्नी आणि अमृतसर पूर्व येथून भाजपच्या आमदार असलेल्या डॉ. नवज्योत कौर यांनी अद्याप पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. (वृत्तसंस्था)
सिद्धूंचा अखेर भाजपाला औपचारिकरीत्या रामराम
By admin | Updated: September 15, 2016 03:05 IST