शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

सलग दुसर्‍या दिवशी भरदिवसा घरफोडी अशोका अपार्टमेंटमधील घटना : सव्वा लाखाचा मुद्देमाल लांबविला

By admin | Updated: January 22, 2016 22:41 IST

जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले असून शुक्रवारीही भरदिवसा दुपारी तीन ते दोन या वेळात दंगलग्रस्त कॉलनीत अशोक अपार्टमेंटमध्ये तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या जरीना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीची हिर्‍याची अंगठी, ३२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी व पंधरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम झुमके असा एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.

जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले असून शुक्रवारीही भरदिवसा दुपारी तीन ते दोन या वेळात दंगलग्रस्त कॉलनीत अशोक अपार्टमेंटमध्ये तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या जरीना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीची हिर्‍याची अंगठी, ३२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी व पंधरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम झुमके असा एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
आकाशवाणी ते सिंधी कॉलनी दरम्यान असलेल्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाजवळ पालखी हॉटेलसमोर अशोका अपार्टमेंट आहे. हा परिसर अतिशय उच्चभ्रू मानला जातो.जरीना बोहरा या सागर हायस्कूलमध्ये शिक्षिका असल्याने सकाळी अकरा वाजताच घरातून बाहेर पडल्या होत्या तर पती सजाद हुसेन बोहरा हे गॅसचे काम करतात. दुपारी तीन वाजता ते घरातून बाहेर गेले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता पत्नीला घेऊन घरी आले असता घराचे कुलूप तुटलेले होते तर घरात कपाटही उघडे होते व सामान अस्ताव्यस्त पडलेला होता.
श्वान पथकाला पाचारण
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर जरीना बोहरा यांनी ही घटना पोलिसांना कळविली. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा पेठचे निरीक्षक श्याम तरवाडकर, गुन्हे शाखेचे राजू मेंढे, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण, दिलीप पाटील, भटू नेरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूला चौकशी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
यापूर्वीही झाली होती चोरी
याच अपार्टमेंटमध्ये वर्षभरापूर्वी डी.एस.कुळकर्णी यांच्या घरातही चोरी झाली होती तर जरीना यांचीही दुचाकी सहा महिन्यापूर्वी चोरी झालेली आहे. आजची ही तिसरी घटना आहे. या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षकही नाहीत व सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आलेले नाहीत.
टॅमीने तोडला कडी कोयंडा
लोखंडी टॅमीने कडी कोयंडा तोडण्यात आला आहे. चोरीनंतर चोरटे ही टॅमी जागेवरच सोडून गेले आहेत. विशेष म्हणजे हॉलमध्ये असलेल्या कपाटातून रोख रक्कम व दागिने चोरी झाले आहेत. कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेले पाच हजार रुपयेही लांबविण्यात आले, मात्र शेजारी असलेल्या बेडरुमध्ये चोरी बेंटेक्सचे दागिने जैसे थे आहेत. चोरट्यांनी त्यांना स्पर्शही केलेला नाही. मुक्ताईनगरात गुरुवारी झालेल्या चोरीची तीच पध्दत येथे वापरण्यात आली आहे.