शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:44 IST

High Court on Live in Relationship: कोटा येथील १८ वर्षीय तरुणी आणि १९ वर्षीय तरुणाने दाखल केलेल्या संरक्षण मिळण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला.

जयपूर : लग्नासाठी आवश्यक असलेले  कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात. या आधारावर एखाद्याचे संवैधानिक अधिकार कमी करता येणार नाहीत, असे राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

कोटा येथील १८ वर्षीय महिला आणि १९ वर्षीय पुरुषाने दाखल केलेल्या संरक्षण मिळण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला. आपण स्वेच्छेने एकत्र राहत आहेत. असे या जोडप्याने न्यायालयाला सांगितले.  त्यावर त्यांच्या  स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे न्यायालयाने सांगितले. 

...तर सुरक्षा द्या -सर्वोच्च न्यायालय

न्यायालयाने भिलवाडा आणि जोधपूर पोलिस अधीक्षकांना याचिकेत नमूद केलेल्या तथ्यांची पडताळणी करण्याचे आणि आवश्यक असल्यास जोडप्याला आवश्यक सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले.

गुरुवारी या आदेशाची प्रत उपलब्ध झाली

या जोडप्याने सांगितले की, त्यांनी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी लिव्ह-इन करार केला होता. तिच्या कुटुंबाने या नात्याला विरोध केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी कोटा पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली, तेव्हा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या याचिकेला विरोध करताना, सरकारी वकील विवेक चौधरी यांनी युक्तिवाद केला की, तरुणाने २१ वर्षांचे कायदेशीर वय गाठले नाही. पुरुषांसाठी हे लग्नाचे किमान कायदेशीर वय असल्याने त्याला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी देऊ नये. 

न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. संविधानाच्या कलम २१ अंतर्गत हमी दिलेला जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार केवळ याचिकाकर्त्यांनी लग्नासाठी कायदेशीर वय गाठले नसल्यामुळे नाकारता येत नाही, न्यायालयाने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Adults can live-in regardless of marriage age: High Court.

Web Summary : Rajasthan High Court: Adults can choose to live-in together, even if below marriageable age. Constitutional rights cannot be denied on this basis. Court directed police to provide protection if needed, dismissing arguments against the couple's choice.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगfraudधोकेबाजी