शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
3
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
4
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
8
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
9
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
10
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
11
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
12
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
13
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
14
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
15
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
16
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
17
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
18
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
19
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
20
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला

युरोपीय देश भारतीय दुग्ध उत्पादनांच्या आयातीत कसलाही भेदभाव करीत नाही!

By admin | Updated: May 17, 2016 06:08 IST

युरोपीय देश दुग्ध उत्पादनांची आयात करण्याच्या बाबतीत भारतीय दुग्ध उत्पादनांसोबत भेदभाव करतात, हा आरोप केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली-युरोपीय देश दुग्ध उत्पादनांची आयात करण्याच्या बाबतीत भारतीय दुग्ध उत्पादनांसोबत भेदभाव करतात, हा आरोप केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. भारतीय सहकार चळवळीचे जिवंत उदाहरण असलेल्या ‘अमूल’ची दुग्ध उत्पादने आयात करताना युरोपीय देश अन्य देशांच्या तुलनेत वेगळे मापदंड अवलंबितात काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न विजय दर्डा यांनी केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, युरोपीय संघ भारतातून दुग्ध उत्पादनांची आयात करण्याची परवानगी देते; परंतु या संघाचे स्वत:चे काही मापदंड ठरलेले आहेत. आरएमपी प्लानअंतर्गत स्वीकृत दुग्ध उत्पादनांच्या आयातीची परवानगी दिली जाते. असे असले तरी जनावरांच्या आजाराच्या नियंत्रणाशी संबंधित कार्यक्रम आणि चिन्हित जनावरांशी संबंधित असलेल्या भारतातील दुग्ध उत्पादनांची आयात करण्याची मात्र परवानगी नाही. भारताने अनेक मंचांवर युरोपीय संघाकडे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे.भारतात आयात करण्यात येणाऱ्या अशा दुग्ध उत्पादनावर स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, भारतात युरोपीय देशांमधून दुग्ध उत्पादनांची आयात केली जाते. परंतु त्या देशांना तसेच अन्य कंपन्यांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे, ज्याअंतर्गत ते देश दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांची भारतात निर्यात करू शकतात. युरोपीय देशांकरिता वेगळा असा कोणताही कायदा नाही. एकच कायदा सर्व देशांना समान रूपात लागू असतो. फार्मा आणि आॅटोमोबाइल क्षेत्रासाठी वेगळा कायदा असल्याबद्दलची कोणतीही तक्रार मंत्रालयाकडे आल्याची माहिती नाही. जीव्हीकेच्या चाचणीबाबतचे एक प्रकरण समोर आले आहे, ज्यावर लक्ष देण्यात येत आहे. भारत आणि युरोपीय संघ द्विपक्षीय चर्चा करीत आहेत. आतापर्यंत चर्चेच्या सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि चर्चा पुढेही सुरूच राहणार आहे. अमेरिका, जपान आणि आॅस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये आरएमपीसारखा कोणताही निर्बंध नाही, असे सीतारामन यांनी सांगितले.