पाचोरा-जामनेर ब्रॉडगेजसाठी प्रयत्न ईश्वरलाल जैन: सर्वेक्षण झाले पूर्ण
By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST
जळगाव : पाचोरा जामनेर या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर केले जावे यासाठी रेल्वे मंत्र्यालयाकडे आपण पत्रव्यवहार केल्याची माहिती खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिली.
पाचोरा-जामनेर ब्रॉडगेजसाठी प्रयत्न ईश्वरलाल जैन: सर्वेक्षण झाले पूर्ण
जळगाव : पाचोरा जामनेर या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर केले जावे यासाठी रेल्वे मंत्र्यालयाकडे आपण पत्रव्यवहार केल्याची माहिती खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिली. पाचोरा-जामनेर ही पीजे रेल्वे गेल्या अनेक वर्षांपासून धावत आहे. शेकडो प्रवासी पाचोर्याहून जामनेरला तर मुंबईकडे जाणारी मंडळी जामनेरहून पाचोर्यास व तेथुन पुढे मुंबईकडे जाणार्या रेल्वेने प्रसास करत असत. मात्र त्यात बराच वेळ जातो. प्रवासी वर्गाची अडचण लक्षात घेऊन पाचोरा, जामनेर पुढे औरंगाबादपर्यंत रेल्वे मार्ग करावा असा आपण प्रस्ताव दिला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अजिंठापर्यंतचे सर्वेक्षण केले आहे. आज औरंगाबदला रेल्वेने जायचे असल्यास मनमाडमार्गे जावे लागते. हा अतिशय दुरचा पल्ला आहे. वेळ वाया जातोच पण रेल्वे प्रशासनासही यामुळे मोठा भुर्दंड बसतो. असे जवळचे मार्ग शोधले जावे या अपेक्षितून आपण हा प्रस्ताव दिला होता. तसेच हा मार्ग ब्रॉडगेज व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्यावर या अंदाजपत्रकात सकारात्मक निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे.