शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत पाच दिवसांसाठी सम-विषम योजना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 22:54 IST

राजधानी दिल्लीत वाहनांसाठी १३ नोव्हेंबरपासून ५ दिवसांसाठी सम-विषम योजना लागू करण्यात येणार आहे. परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांनी ही माहिती दिली. शहराच्या प्रदूषणात गंभीर वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.        

ठळक मुद्दे१३ नोव्हेंबर रोजी प्रारंभ : परिवहनमंत्र्यांची माहिती    

 नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत वाहनांसाठी १३ नोव्हेंबरपासून ५ दिवसांसाठी सम-विषम योजना लागू करण्यात येणार आहे. परिवहनमंत्री कैलाश गहलोत यांनी ही माहिती दिली. शहराच्या प्रदूषणात गंभीर वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.         या धोरणानुसार, खासगी वाहने नंबर प्लेटच्या शेवटच्या अंकानुसार सम-विषम गृहीत धरले जातील. सम तारखेला सम नंबरची वाहने, तर विषम तारखेला विषम नंबरची वाहने रस्त्यावर धावतील. २०१६ मध्ये १ ते १५ जानेवारी आणि १५ ते ३० एप्रिलपर्यंत सम-विषम योजना दोन टप्प्यांत लागू करण्यात आली होती. 

हरित लवादाने फटकारले         दिल्लीतील प्रदूषणाने सलग तिस-या दिवशी धोक्याची पातळी गाठल्याने राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकार, महापालिका आणि शेजारी राज्यांतील सरकारांना फटकारले आहे. प्रदूषणावर अंकुश आणणे ही संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगत लोकांच्या जीवनाशी हा खेळ सुरू असल्याबद्दल हरित लवादाने नाराजी व्यक्त केली. हरित लवादाने म्हटले आहे की, नागरिकांना जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. यापूर्वीच्या आदेशानंतरही शहरातील बांधकाम थांबलेले नाही. १० वर्षांपूर्वीची डिझेल वाहने आणि १५ वर्षांपूर्वीची पेट्रोल वाहने यांना शहरात प्रवेशास बंदी करा, असे आवाहनही हरित लवादाने राज्य सरकारला केले आहे.            केंद्र, दिल्ली सरकारला नोटीस   प्रदूषणामुळे जीवन आणि आरोग्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांंगत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गुरुवारी केंद्र, दिल्ली सरकार आणि पंजाब, हरियाणा सरकारांना नोटीस पाठविली आहे. आवश्य पावले न उचलणाºया अधिकाºयांनाही आयोगाने फैलावर घेतले. विविध केंद्रीय मंत्रालये आणि तीन राज्य सरकारे यांना उपाययोजनांबाबत दोन आठवड्यांच्या आत अहवाल मागविला आहे. आयोगाने म्हटले आहे की, विषारी वायू, धुके या कारणामुळे सरकार नागरिकांना मरण्यासाठी सोडून देऊ शकत नाही. केंद्रीय पर्यावरण, आरोग्य आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिवांसह दिल्ली, पंजाब आणि हरियाणा सरकारांच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करण्यात आली आहे.