नवी दिल्ली : पंतप्रधान घरकुल योजनेसाठी ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थींना सारखेच अनुदान द्यावे, अशी मागणी अपक्ष सदस्य नवनीत राणा यांनी गुरुवारी लोकसभेत केली.त्या म्हणाल्या, शहरी भागातील लोकांना या योजनेतून अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते परंतु ग्रामीण भागातील लोकांना केवळ सव्वा लाख रुपये मिळतात. ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या सिमेंट, वाळू, विटा खरेदीसाठी सारखेच पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे दोन्ही भागातील लोकांना अडीच लाख रुपयांचा निधी द्यावा.अमरावती जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने झालेली नाही. अमरावती जिल्ह्यात सव्वा लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळण्याची आवश्यकता असताना फार कमी लोकांना याचा लाभ मिळाला आहे. अमरावती विभागात ८ लाख लोकांना लाभ मिळण्याची आवश्यकता आहे.
घरकुल योजनेसाठी समान निधी द्यावा- नवनीत राणा यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 00:05 IST