शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएफमधून मुदतीआधी काढा ५ लाख, ईपीएफओकडून ऑटो क्लेम मर्यादा वाढविण्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:47 IST

EPFO: कर्मचारी भविष्य निधीच्या (ईपीएफ) अग्रीम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी (एएसएसी) असलेली सध्याची १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मंजुरी दिली आहे.

 नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निधीच्या (ईपीएफ) अग्रीम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी (एएसएसी) असलेली सध्याची १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मंजुरी दिली आहे. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. 

‘एएसएसी’ व्यवस्थेला ‘ऑटो क्लेम’ असेही म्हटले जाते. याच नावानेच ही यंत्रणा लोकप्रिय झाली आहे. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, २८ मार्च रोजी श्रीनगरमध्ये  झालेल्या ईपीएफओच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी दिली. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सीबीटीला पाठविला आहे. या मंजुरीनंतर कर्मचारी आपल्या ईपीएफ खात्यातून विना पडताळणी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतील. सध्या ऑटो क्लेमच्या साह्याने १ लाख रुपयेच काढता येतात. त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ईपीएफओ अधिकाऱ्यांकडून पडताळणी प्रक्रिया पार पाडली जाते.

काय आहे ऑटो क्लेम?‘एएसएसी’ अथवा ऑटो क्लेम ही एक स्वयंचलित यंत्रणा आहे. ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी दाखल केलेल्या दाव्यास ही यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने स्वत:च मंजुरी देते. यात मानवी हस्तक्षेपाची गरज नसते. केवायसी पडताळणी पूर्ण झालेली असल्यास अवघ्या ३ ते ५ दिवसांत दाव्याचे पैसे मंजूर होतात. यात दस्तावेज जमा करण्याची अथवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नसते. 

टॅग्स :EPFOईपीएफओProvident Fundभविष्य निर्वाह निधी