नवी दिल्ली : लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची पर्यावरण आणि वन मंत्रालयातर्फे (एमओईएफ) ‘शिकारी जमातीचे पुनर्वसन आणि व्याघ्र संरक्षण’ यावरील संसदीय सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खा. दर्डा यांच्यासह राज्यसभेतील ७ व लोकसभेतीलही ७ सदस्यांचा समावेश समितीत करण्यात आला आहे. शिकारी जमातींमध्ये पारधी, बावरिया, बहेलिया जमातींच्या पुनर्वसनाबाबत ही समिती सल्ला देईल. या सल्लागार समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा राहील.सल्लागार समितीत राज्यसभा सदस्य व्ही.पी. सिंग बडनोरे, विजय दर्डा, ए.यू. सिंग देव, रणविजय सिंग जूदेव, डॉ. चंदन मित्रा, नीरज शेखर, तरुण विजय व लोकसभा सदस्य दुष्यंत सिंग, कलिकेश सिंग देव, सुशील कुमार सिंग, कीर्तीवर्धन सिंग, अर्क केशरी देव, नागेंद्र सिंग व पी.डी. राय यांचा समावेश आहे.या विषयांवर सल्ला देणार...1. वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालणे.2 .शिकारीवर उपजीविका असलेल्यांचे पुनर्वसन.3 .देशातील व्याघ्र संरक्षणासाठी उपाययोजना. 4 .वाघांच्या अधिवासाजवळील भागात गावांचे पुनर्वसन.
पर्यावरण मंत्रालयाच्या समितीवर विजय दर्डा
By admin | Updated: June 7, 2015 01:25 IST