शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समितीने मागविला प्रवेश, नोक-यांचा जातनिहाय तपशील, सर्व राज्यांना पाठविली पत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 02:21 IST

इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जातींना उपगटांत विभाजित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिनाभरापूर्वी नेमलेल्या समितीने सर्व राज्यांकडून गेल्या तीन वर्षांतील उच्चशिक्षण संस्थांतील प्रवेश आणि नोकरभरती यांचा जातनिहाय तपशील मागविला आहे.

भुवनेश्वर : इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जातींना उपगटांत विभाजित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिनाभरापूर्वी नेमलेल्या समितीने सर्व राज्यांकडून गेल्या तीन वर्षांतील उच्चशिक्षण संस्थांतील प्रवेश आणि नोकरभरती यांचा जातनिहाय तपशील मागविला आहे.उपगट केल्याने ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ मिळविण्यात कोणत्या जाती जास्त मागे आहेत, हे कळेल. तसेच सामर्थ्यशाली जाती इतरांना बाजूला सारून जास्त लाभ मिळविणार नाहीत, यासाठी उपाययोजनाही करता येतील. ओबीसी जातींना सध्या सरकारी नोकºया आणि सरकारी महाविद्यालयांत २७ टक्के आरक्षण मिळते. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी घटनेच्या ३४० कलमान्वये आॅक्टोबरमध्ये एक आदेश जारी करून ओबीसींची उपगटात विभागणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जी. राहिणी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करीत आहे. या समितीने आता राज्य सरकारांकडून प्रवेश आणि नोकºयांचा तपशील मागविला आहे. समितीचे सचिव यू. वेंकटश्वरालू यांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्य सरकारांना मिळाले आहे. असेच पत्र ओडिशा सरकारला मिळाले असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.समितीला हवी ही माहितीया समितीने सर्व राज्यांकडून पुढील माहिती मागविली आहे- ओबीसी प्रवर्गात किती जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली?- १९३१ च्या जनगणनेनुसार राज्यातील जातींच्या नावांची यादी तसेच या यादीतील कोणत्या जाती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहेत?- या यादीतील प्रत्येक जातीची राज्यातील संख्या किती? या जातींची जिल्हानिहाय संख्या किती?- राज्यांनी ओबीसींचे उपगट तयार करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत काय?

टॅग्स :jobनोकरी