गोवर्धन येथील शाळेत प्रवेशोत्सव
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
नाशिक : जिल्हा परिषद शाळा गोवर्धन येथे शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यावेळी उपस्थित होत्या. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांची परिसरातून ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. गावातून प्रभातफेरी काढून शाळाबा मुलांना शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक बी. एस. सूर्यवंशी, जि. प. शिक्षणाधिकारी रहिम मोगल, आर. पी. पाटील, अनिल शहारे, चित्रा देवरे, केंद्रप्रमुख गांगुर्डे, सरपंच मीना गबाले, हरिभाऊ गबाले, माजी सरपंच पी. के. जाधव, अलका कासार, प्रमोद जाधव, गोविंद पाटील, छाया देवरे, प्रतिभा निर्मळ, रजनी कापडणीस, दीप्ती चित्ते आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष अहिरे यांनी केले. आभार सीमा पाटील यांनी मानले.
गोवर्धन येथील शाळेत प्रवेशोत्सव
नाशिक : जिल्हा परिषद शाळा गोवर्धन येथे शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यावेळी उपस्थित होत्या. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या विद्यार्थ्यांची परिसरातून ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. गावातून प्रभातफेरी काढून शाळाबा मुलांना शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक बी. एस. सूर्यवंशी, जि. प. शिक्षणाधिकारी रहिम मोगल, आर. पी. पाटील, अनिल शहारे, चित्रा देवरे, केंद्रप्रमुख गांगुर्डे, सरपंच मीना गबाले, हरिभाऊ गबाले, माजी सरपंच पी. के. जाधव, अलका कासार, प्रमोद जाधव, गोविंद पाटील, छाया देवरे, प्रतिभा निर्मळ, रजनी कापडणीस, दीप्ती चित्ते आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष अहिरे यांनी केले. आभार सीमा पाटील यांनी मानले. -- रवींद्र मंडळ शाळा --नाशिक : बागवानपुरा येथील रवींद्र मंडळ संचलित प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी प्रथमच शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. नगरसेवक संजय साबळे यावेळी उपस्थित होते. पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सविता पवार यांनी औक्षण केले. विद्यार्थ्यांना खाऊ, खेळणी वाटप करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, नीलेश वाघ, सचिन मेढे उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली नागपुरे यांनी केले. पाडवी यांनी प्रार्थना म्हटली. मान्यवरांचा परिचय तिडके यांनी करून दिला. दुसाने यांनी आभार मानले.