शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आईला भेटण्यासाठी अभियंत्याचा बाईकवरून सव्वादोन हजार किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:25 IST

अहमदाबादहून बाईकने २,३४ ६ किमीचा प्रवास करत तामिळनाडू गाठले. त्यासाठी त्यांना चार दिवस लागले.

श्रीविल्लीपुत्तुर : आजारी आईला लॉकडाऊनमुळे भेटणे अशक्य झाल्याने दिवसरात्र तळमळणाऱ्या व अहमदाबादमध्ये प्रॉजेक्ट इंजिनिअर म्हणून काम करणाºया एन. चंद्रमोहन (४३ वर्षे) यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अहमदाबादहून बाईकने २,३४ ६ किमीचा प्रवास करत तामिळनाडू गाठले. त्यासाठी त्यांना चार दिवस लागले.चंद्रमोहन यांच्या आईने काचबिंदूमुळे एक डोळा गमावला असून तिची प्रकृती बिघडली होती. तिचा एक मुलगा चेन्नई व मुलगी तिरुवन्नमलाई या ठिकाणी राहातात. लॉकडाऊनमुळे या दोघांनाही आपली आई राहात असलेल्या सिरकाझी गावाला जाणे शक्य होत नव्हते. आई एकटी पडली असेल या भावनेने आणखी अस्वस्थ झालेल्या चंद्रमोहन यांनी अहमदाबाद जिल्हा प्रशासनाकडून ई-पास मिळवून आपल्या बाईकवरून २२ एप्रिल रोजी तामिळनाडूच्या दिशेने कुच केले. वाटेत जंगलातून जाणारा रस्ता दिवसाढवळ््या पार करायचा, तसेच रात्री पेट्रोल पंप किंवा एखादे बरे ठिकाण बघून तिथे झोप काढायची असे त्यांनी ठरविले होते. आपल्या सॅकमध्ये बिस्किटांचे पुडे व पाण्याच्या बाटल्या भरून ते प्रवासाला निघाले. एका स्वयंसेवी संस्थेने प्रवासादरम्यान चंद्रमोहन यांची सकाळ व संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्याच्या भरवशावर त्यांनी हा प्रवास पार पाडला. दिवसाला पंधरा तास ते बाईक चालवत असत. दर एक तासाने थांबून ते पाच मिनिटे विश्रांती घेत व मग मार्गस्थ होत. अखेर २५ एप्रिल रोजी रात्री साडेआठला वात्रपला आपल्या सासरी पोहोचले. वाटेमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी त्यांना हटकले पण ई-पास असल्याने त्यांना कोणीही रोखले नाही .