शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३० किलो सोनं, ५ आलिशान गाड्या; अभियंत्याकडे सापडलं घबाड; अधिकारी मोजून मोजून दमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 10:47 IST

अभियंत्याच्या घरात सापडली उत्पन्नापेक्षा १४५० टक्के अधिक संपत्ती; अधिकारीदेखील चक्रावले

जयपूर: राजस्थानात भ्रष्टाचारविरोधी विभागाची धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. जयपूर, जोधपूर आणि चित्तोढगडमध्ये ३ अधिकाऱ्यांशी संबंधित १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. जयपूर विकास प्राधिकरणात (जेडीए )अभियंता असलेला निर्मल गोयलच्या घरी एसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या उत्पन्नाच्या १४५० टक्के अधिक संपत्ती सापडली आहे. 

जेडीएमध्ये अभियंता असलेल्या निर्मल गोयलचं वेतन दीड लाख रुपये आहे. मात्र जयपूरमधील मोक्याच्या ठिकाणी एका वसाहतीत त्याची चार आलिशान घरं आहेत. अधिकाऱ्यांना अभियंत्याच्या फार्म हाऊसमध्ये ३ लाख ८७ हजारांची रोकड, ३० किलो सोनं, २४५ युरो, २ हजार डॉलर, मर्सिडिझसह पाच महागड्या कार आढळून आल्या आहेत. तीन बँकांमध्ये अभियंत्याचे लॉकरदेखील आहेत. ते अद्याप उघडायचे आहेत.

जिल्हा परिवहन अधिकाऱ्याच्या घरावर छापाचित्तौढगडमध्ये जिल्हा परिवहन अधिकारी मनीष शर्माजवळ दोन कोटींच्या गुंतवणुकीची कागदपत्रं सापडली आहेत. त्याच्या सदनिकेत एक लाखाची रोकड आणि परदेश प्रवासाची कागदपत्रं आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी त्याच्या घराजवळून महागड्या दुचाकी आणि कारदेखील ताब्यात घेतल्या आहेत.

निरीक्षकाची संपत्ती उत्पन्नापेक्षा ३३३ टक्क्यांनी जास्तजोधपूरमध्ये निरीक्षक प्रदीप शर्माच्या घरावर भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पथकानं छापा टाकला. शर्माच्या भोपाळ, बिकानेरमधील मालमत्तावरदेखील छापे टाकण्यात आले. त्यातून साडे चार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती समोर आली. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नाच्या ३३३ टक्के अधिक आहे. सूरसागर ठाण्यात तैनात असलेल्या निरीक्षक प्रदीप शर्माची जोधपूर, भोपाळमध्ये जमीन असून त्याच्या मालकीची एक शाळा आणि तीन बसेसदेखील आहेत.