शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक देशासाठी ऊर्जा सुरक्षा अतिशय महत्त्वाची; केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:16 IST

 अनुभा जैन - बंगळुरू : प्रत्येक देश ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देतो. ऊर्जा सुरक्षा व तंत्रज्ञानाशिवाय विद्युतपुरवठ्याबद्दल कोणताही महत्त्वाचा निर्णय ...

 अनुभा जैन -

बंगळुरू : प्रत्येक देश ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देतो. ऊर्जा सुरक्षा व तंत्रज्ञानाशिवाय विद्युतपुरवठ्याबद्दल कोणताही महत्त्वाचा निर्णय घेता येणे शक्य नाही. चोवीस तास अक्षय ऊर्जेचे लक्ष्य तिच्या साठवणुकीशिवाय गाठता येणार नाही. भारताने २०३० पर्यंत आपल्या बिगर जिवाश्म ऊर्जा क्षमतेचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची योजना आखली आहे, असे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी म्हटले आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून स्थापन केलेल्या ऊर्जा संक्रमणासंदर्भातील कार्यकारी गटाच्या रविवारपासून सुरू झालेल्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते.

बंगळुरू येथील हॉटेल ताज वेस्टएन्ड येथे आयोजिलेली ही बैठक मंगळवारी, ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आर. के. सिंह यांनी सांगितले की, ऊर्जेसंदर्भातील सर्व पैलूंवर जगातील सर्व राष्ट्रांनी चर्चा केली पाहिजे. विकसनशील देशांसमोर ऊर्जेसंदर्भात गंभीर समस्या उभ्या ठाकल्या आहेत. ऊर्जा, तंत्रज्ञान, त्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा आदी गोष्टींबाबतच्या आव्हानांना सर्व देशांनी एकजुटीने सामोरे जाण्याची आवश्यकता आहे.जी-२० परिषदेच्या माध्यमातून स्थापन केलेल्या ऊर्जा संक्रमणासंदर्भातील कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठकीला केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. या बैठकीत कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन, स्टोअरेज या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध देशांचे १५०हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. जागतिक बँक, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या संघटना या चर्चासत्रात सहभागी झाल्या आहेत. या चर्चासत्राला आलेल्या प्रतिनिधींना इन्फोसिस ग्रीन बिल्डिंग कॅम्पस आणि पावगडा सोलर पार्कही पाहता येणार आहे.