शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन संपताच शहरांमधील बेरोजगारीचा दर होऊ लागला कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:52 IST

सरकारची माहिती : यापूर्वी होते खासगी संस्थांचे सर्वेक्षण

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर - डिसेंबर २०२० या कालावधीत शहरांतील बेरोजगारीचा दर आदल्या तिमाहीच्या तुलनेत घटून १०.३ टक्के झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.एनएसओने दीर्घ काळापासून बेरोजगारीची आकडेवारी जारी केलेली नव्हती. या आकडेवारीसाठी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीसारख्या (सीएमआयई) खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. या अहवालासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात अखिल भारतीय पातळीवर एकूण ५,५६३ यूएफएस ब्लॉकमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

एनएसओच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२०ला संपलेल्या तिमाहीत भारतातील बेरोजगारीचा दर १०.३ टक्के राहिला. त्याआधीच्या जुलै - सप्टेंबर २०२० या तिमाहीत तो १३.२ टक्के होता. आदल्या वर्षाच्या तुलनेत मात्र बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१९ला संपलेल्या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर एकअंकी ७.८ टक्के होता. अहवालात म्हटले आहे की, डिसेंबर २०२०च्या तिमाहीत शहरांतील सर्व वयोगटातील लोकांचा श्रमशक्ती सहभागिता दर ३७.३ टक्के राहिला. आदल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो ३७.२ टक्के होता. तसेच जुलै-सप्टेंबर २०२०च्या तिमाहीत तो ३७ टक्के होता. 

जून २०२०मध्ये सर्वाधिक बेरोजगारीएनएसओने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वित्त वर्ष २०२० - २१च्या एप्रिल - जून तिमाहीत बेरोजगारी सर्वाधिक २०.८ टक्के होती. या काळात कोविड-१९ साथीमुळे देशभरात सक्तीचे लॉकडाऊन सुरू होते.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार