श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सोपोर क्षेत्रात सोमवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. पांगला कार्तिक असे त्याचे नाव आहे.
सोपोर येथील झलुरा गुज्जरपटी येथे दहशतवादी दडून बसलेले आहेत, अशी माहिती मिळाल्यामुळे सुरक्षा दलाने त्या परिसरात शोधमोहिम हाती घेतली होती. त्यावेळी सोमवारी पहाटे या दहशतवाद्यांशी चकमक होऊन त्यात पांगला कार्तिक शहीद झाले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी त्यांच्या छुप्या अड्ड्याला सुरक्षा दलाने घेरले असता, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. काश्मीर खोऱ्याबरोबरच जम्मूच्या क्षेत्रात गेल्या काही महिन्यांत दहशतवादी कारवाया वाढल्याने लष्कर अधिक सतर्क झाले आहे. (वृत्तसंस्था)
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दहशतवाद्यांनी कोणत्याही घातपाती कारवाया करू नये, याकरिता लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.