शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शोपियाँ येथील चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध गवई यांना वीरमरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 13:34 IST

श्रीनगर, दि. 13 - जम्मू  आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून  सुरू असलेल्या चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध वामन गवई यांना वीरमरण आले आहे. गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र होते. या चकमकीमध्ये गवई यांच्यासह अन्य एका जवानाला वीरमरण आले आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीदरम्यान लष्कराने ...

श्रीनगर, दि. 13 - जम्मू  आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून  सुरू असलेल्या चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध वामन गवई यांना वीरमरण आले आहे. गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र होते. या चकमकीमध्ये गवई यांच्यासह अन्य एका जवानाला वीरमरण आले आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीदरम्यान लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार मारले आहे. सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते, असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शोपियन जिल्ह्यातील अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, लष्काराच्या जवानांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु आहे. तर, दुसरीकडे कुपवाडा परिसरात सुद्धा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जखमी  झाला आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद...नियंत्रण रेषेवरील पूंछ क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात नायब सुभेदार जगरामसिंग तोमर (42) हे शहीद झाले. ते  मध्यप्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील तारसाना गावचा रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी उमावती देवी, मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या पाच दिवसांत सीमेवर धारातीर्थी पडलेले ते दुसरे  जवान आहेत.