शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा : उडत्या विमानाची टाकी रिकामी केली, सगळी घाण पडली शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:21 IST

फझीलपूर बदली गावातील शेतात शनिवारी आकाशातून एक गोष्ट येऊन पडली. गावातील लोकांना वाटले की या शेतात उल्काच कोसळली. मग त्याची गावभर चर्चा झाली. मग शास्त्रज्ञ आले. त्यांनी तपासणी केली. शेतात जे काही पडले होते ते उल्का नव्हती तर ती होती मानवी विष्ठा.

गुरुग्राम : फझीलपूर बदली गावातील शेतात शनिवारी आकाशातून एक गोष्ट येऊन पडली. गावातील लोकांना वाटले की या शेतात उल्काच कोसळली. मग त्याची गावभर चर्चा झाली. मग शास्त्रज्ञ आले. त्यांनी तपासणी केली. शेतात जे काही पडले होते ते उल्का नव्हती तर ती होती मानवी विष्ठा. गुरुग्रामवरुन उड्डाण करणा-या विमानाच्या शौचालयातील मानवी विष्ठेने भरलेली टाकी रिकामी करण्यात आली होती व ती सारी घाण पडली या शेतात...उड्डाण करत असताना विमानाच्या शौचालयातील मानवी विष्ठेने भरलेली टाकी वस्ती असलेल्या भागांवरून जाताना रिकामी करणे टाळावे असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने २० डिसेंबर २०१६ रोजी दिला होता. या आदेशाचीच आठवण करुन देणारे परिपत्रक सर्व विमान कंपन्यांना पुन्हा जारी करावे, असे न्यायादिकरणाने दहा दिवसांपूर्वीच नागरी विमान वाहतूक खात्याला कळविले होते. उड्डाण करत असताना विमानाच्या शौचालयातील मानवी विष्ठेने भरलेली टाकी रिकामी केल्याचे निदर्शनास आल्यास त्या विमान कंपनीला ५० हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईल, असेही या आदेशात बजावण्यात आले होते. त्यानंतर १० दिवसांनी हा नवा प्रकार घडला आहे.विमानातून मानवी विष्ठा फझीलपूर बदली गावातील ज्याच्या शेतात टाकण्यात आली तो शेतमालक बलवान म्हणाला की, शनिवारी सकाळी आठ वाजता आकाशातून एक गोष्ट शेतात येऊन पडली. ती नेमकी काय आहे हे पाहाण्यासाठी लोक गोळा होऊ लागले. गर्दी वाढू लागल्यामुळे सरतेशेवटी सरपंच गोविंद सिंग यांना पाचारण केले गेले. सरपंचाने पोलिसांनी ही घटना कळविली.मीही शेताकडे धाव घेतली व आकाशातून पडलेली ती गोष्ट पाहिली. तिचे वजन ८ ते १० किलो असावे. हा न वितळणारा बर्फ असावा असेही आम्हाला वाटले. त्या गोष्टीला हात लावणे कदाचित धोक्याचे ठरु शकेल म्हणून ते धाडस केले नाही.(वृत्तसंस्था)वैज्ञानिकांनी केली तपासणी-शेतात पडलेली ही वस्तू नेमकी काय आहे हे तपासण्यासाठी सरतेशेवटी पोलिसांनी हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाºयां पाचारण केले. त्यांनी केलेल्या तपासणीत ही मानवी विष्ठा असल्याचे निष्पन्न झाले. विमान खूप उंचावरून उड्डाण करत असताना, शौचालयाच्या टाकीतून गळती होऊन विष्ठा खाली पडली, तर कमी तापमानामुळे ती जमिनीवर येऊन पडेपर्यंत बर्फासारखी गोठलेली असते.

टॅग्स :Haryanaहरयाणा