ँँमक्तेदाराच्या सफाई कर्मचार्यांची दिवाळी अंधारात
By admin | Updated: October 29, 2016 01:09 IST
जळगाव: मनपाच्या सफाई मक्तेदाराकडील कामगारांना वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यापैकी एकमुस्त दरपद्धतीने सफाईसाठी मक्ता दिलेल्या मक्तेदारास केवळ १ महिन्यांचेच बिल अदा करणे बाकी असतानाही सफाई कामगारांचे मात्र ४ महिन्यांपासूनचे पगार अदा करण्यात आलेले नसल्याची तक्रार आहे. तर मनपा कायम सफाई कर्मचार्यांचे पगार झाले असले तरी त्यांच्या घरातील अन्य सदस्य हे मक्तेदारांकडे कामाला असल्याने त्यांचेही पगार रखडले आहेत. त्यामुळे उधार-उसनवारीवरच त्यांनाही दिवाळी साजरी करावी लागत आहे.
ँँमक्तेदाराच्या सफाई कर्मचार्यांची दिवाळी अंधारात
जळगाव: मनपाच्या सफाई मक्तेदाराकडील कामगारांना वेतन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यापैकी एकमुस्त दरपद्धतीने सफाईसाठी मक्ता दिलेल्या मक्तेदारास केवळ १ महिन्यांचेच बिल अदा करणे बाकी असतानाही सफाई कामगारांचे मात्र ४ महिन्यांपासूनचे पगार अदा करण्यात आलेले नसल्याची तक्रार आहे. तर मनपा कायम सफाई कर्मचार्यांचे पगार झाले असले तरी त्यांच्या घरातील अन्य सदस्य हे मक्तेदारांकडे कामाला असल्याने त्यांचेही पगार रखडले आहेत. त्यामुळे उधार-उसनवारीवरच त्यांनाही दिवाळी साजरी करावी लागत आहे. मनपाने सफाईसाठी संपूर्ण शहरात एकमुस्त दरपद्धतीने सफाई कामगार पुरविण्याचा ठेका दिला आहे. त्या मक्तेदाराचे मागील पेमेंट अदा करण्यात आले आहे. मात्र तरीही सफाई कामगारांना मात्र चार महिन्यांचे पगार अदा करण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या सफाई कामगारांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. तसेच मनपाच्या कायम सफाई कामगारांचे पगार झाले आहेत. मात्र हा पगार पुरेसा नसल्याने घरातील किमान एक-दोन सदस्य हे खाजगी मक्तेदाराकडे कामाला आहेत. त्यांचेही पगार झालेले नसल्याने या सफाई कामगारांनादेखील उधार, उसनवारीवर दिवाळी साजरी करावी लागत आहे.