शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: लॉकडाऊननंतर कामाचे तास वाढणार?; मोदी सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:20 IST

coronavirus अध्यादेशामुळे कामाचे तास वाढवण्याचा अधिकार राज्यांना मिळणार

नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असल्याची घोषणा केली. या मोठ्या घोषणेनंतर आता सरकार कोरोनामुळे झालेलं नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीनं तयारीला लागल्याचं दिसत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढण्याची दाट शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा केंद्राचा विचार असून त्यासाठी अध्यादेश काढला जाऊ शकतो. इकॉनॉमिक टाईम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.मोदी सरकारनं काढलेल्या अध्यादेशामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचे तास वाढवण्याचे अधिकार मिळतील. कामाचे तास किती वाढवायचे याचा निर्णय सर्वस्वी राज्यांना असेल. यासाठी केंद्र सरकारचं कामगार मंत्रालय ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कन्डिशन्स विधेयक आणेल. त्यामुळे राज्य सरकार किंवा संबंधित प्रशासनाला कामाचे तास ठरवण्याचा अधिकार मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं इकॉनॉमिक टाईम्सनं म्हटलं आहे.लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी, मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परतले आहेत. लॉकडाऊननंतर हा कर्मचारी वर्ग तातडीनं कार्यालयांमध्ये, कारखान्यांमध्ये रूजू होणार नाही. त्यासाठी काही दिवसांचा कालावधी जावा लागेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि त्यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी कामाचे तास वाढवले जावेत, अशी मागणी कंपन्या, उद्योग आणि संस्थांच्या प्रमुखांनी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारनं अध्यादेश काढण्याची तयारी सुरू केली.पंतप्रधान मोदींनी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. तो २१ दिवसांचा कालावधी आज संपला. मात्र कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत असल्यानं मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवला. २० एप्रिलपर्यंत कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांमधले निर्बंध शिथिल केले जातील, असं मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी