शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

सहानुभूती सर्वांनाच; अत्याचार मात्र सुरूच!

By admin | Updated: July 22, 2016 03:40 IST

संसदेत सारेच पक्ष साहानुभूतीने बोलतात मात्र प्रत्यक्षात हे अत्याचार कसे थांबतील, याविषयी कोणीच काही करीत नाही.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- दलितांवरील अत्याचाराबाबत संसदेत सारेच पक्ष साहानुभूतीने बोलतात मात्र प्रत्यक्षात हे अत्याचार कसे थांबतील, याविषयी कोणीच काही करीत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क प्रदान करणारी राज्यघटना दिली. काँग्रेस आणि भाजपच्या दीर्घकालिन राजवटीत दलितांवरचे अत्याचार मात्र थांबले नाहीत, असे प्रतिपादन बसप नेत्या मायावतींनी राज्यसभेत केले. अलीकडेच घडलेल्या दलित अत्याचाराच्या दुर्देवी घटनांबाबत अल्पकालिन चर्चेत त्या बोलत होत्या. यावेळी मायावतींखेरीज तमाम पक्षाच्या नेत्यांनी देशभर दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या मुद्द्याचे विस्ताराने स्पष्टीकरण करीत मायावती पुढे म्हणाल्या, पक्षीय आणि राजकीय मतभेद विसरून देशात दलित व वंचित समाजातले लोक मला देवी मानतात, सन्मानाची वागणूक देतात. त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या देवीबाबत कोणी अपशब्द वापरणार असेल तर ते कसे सहन करतील? विरोध तर नक्कीच करतील. मी त्यांना कसे थांबवणार? या प्रसंगात देशातले सर्वपक्षीय खासदार माझ्या पाठिशी उभे राहिले, याचे मला समाधान आहे. माझ्याविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या दयाशंकरला भाजपने पक्षातून निलंबित करून एक सामान्य उपचार पूर्ण केला आहे. त्यापेक्षा त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली असती तर अधिक चांगले झाले असते.>दलितविरोधी प्रवृत्तींची आक्रमकता चिंताजनकदलितांना मारहाण करणाऱ्या गोरक्षकांचा तसेच मायावतींच्या विरोधात अपमानजनक शब्दांचा प्रयोग करणाऱ्या दयाशंकर यांचा भाजपच्या विनय सहस्त्रबुध्दे यांनी स्पष्ट शब्दात निषेध केला. राज्यमंत्री रामदास आठवलेंनीही त्यांना दुजोरा देणारे भाषण केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी म्हणाले, दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दलितविरोधी प्रवृत्तींची अशी आक्रमकता केवळ भयावह नव्हे तर चिंताजनक आहे.