शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आणीबाणी काळा काळ; आठवणीने थरकाप उडतो - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 08:17 IST

पंतप्रधान म्हणाले की, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या गुन्ह्याला समजून घेणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : २५ जून विसरू शकत नाही, याच दिवशी आमच्यावर आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारताच्या इतिहासातील हा काळा काळ होता. लाखो लोकांनी पूर्ण ताकदीनिशी आणीबाणीला विरोध केला. त्या काळात लोकशाहीच्या समर्थकांचा  ज्या प्रकारचा छळ झाला ते आठवले की आजही मनाचा थरकाप उडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

‘मन की बात’च्या १०२ व्या भागात पंतप्रधान मोदींनी रविवारी जागतिक योग दिन, ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाची आपत्कालीन परिस्थिती, खेळ, २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याची मोहीम आणि निसर्ग संवर्धन याबद्दल मते मांडली. चक्रीवादळात कच्छच्या लोकांनी दाखवलेल्या अभूतपूर्व धैर्याचे त्यांनी कौतुक केले.

मोदी म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. आपण आपली राज्यघटना सर्वोपरी मानतो, म्हणून आपण २५ जूनला कधीही विसरू शकत नाही. तो काळा काळ होता.  याच दिवशी आपल्या देशात आणीबाणी लागू झाली होती.  लाखो लोकांनी याला पूर्ण ताकदीनिशी विरोध केला होता, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान म्हणाले की, देश जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या गुन्ह्याला समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे आजच्या तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि महत्त्व समजणे सोपे जाईल, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवरायांचा उल्लेख...या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली. शिवाजी महाराजांच्या शौर्याशिवाय, त्यांच्या शासन आणि व्यवस्थापन कौशल्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत केलेले कार्य आजही भारतीय इतिहासाची शान वाढवत आहे. त्यांनी बांधलेले किल्ले इतक्या शतकांनंतरही समुद्राच्या मधोमध अभिमानाने उभे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पाच दशकांनंतर  निळवंडे होतेय पूर्णपाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी चाचणी दरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळची जी छायाचित्रे समोर आली ती खरच खूप भावूक करणारी होती. गावातील लोकं दिवाळी असल्यासारखी नाचत होती.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी