शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Assembly Elections 2021: पश्चिम बंगालसह 5 राज्यांत निवडणुका जाहीर, केवळ 5 लोकच घरो-घरी जाऊन करू शकणार प्रचार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 26, 2021 18:22 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा कालावधीही 1 तासांनी वाढविण्यात आला आहे. (Election commission)

ठळक मुद्देदेशातील च राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला या निवडणुकीत उमेदवारांना केवळ 5 लोकांना सोबत घेऊनच घरो-घरी जाऊन प्रचार करता येणार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार

नवी दिल्ली -पश्चिम बंगालसह (West Bengal) तमिळनाडू (Tamil Nadu), आसाम (Assam), केरळ (Kerala) आणि पदुच्चेरी (Puducherry) या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. यासंदर्भात आज निवडणूक आयोगाने घोषणा केली. कोरोना काळात या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा विचार करता, या निवडणुकीत उमेदवारांना केवळ 5 लोकांना सोबत घेऊनच घरो-घरी जाऊन प्रचार करता येणार आहे. यापूर्वी बिहारमध्येही कोरोना काळातच निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या आहेत. (Elections announced in 5 states only 5 people will be able to campaign from door to door)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचाऱ्यांचे लसिकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदानाचा कालावधीही 1 तासांनी वाढविण्यात आला आहे. याशिवाय सर्व पोलिंग बुथवर सॅनिटायझर, मास्क, सोप वाटर, पिण्याचे पाणी, वीज, वेटिंग एरिया आणि व्हिल चेअर आदिंची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Assembly Elections 2021: बिगुल वाजला... देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा 

18 कोटीहून अधिक मतदार मतदाननाचा हक्क बजावतील -या विधानसभा निवडणुकीत एकूण 824 विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून 18 कोटीहून अधिक मतदार मतदान करतील. महत्वाचे म्हणजे सर्व ठिकाणी मतदान केंद्र ग्रउंड फ्लोर वरच असेल. यात कसल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे ही निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटले आहे.

कोणत्या राज्यात केव्हा संपतो विधानसभेचा कार्यकाळ? -निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे 2021 रोजी, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 30 मे 2021 रोजी, केरळ विधानसभेचा कार्यकाळ 1 जून 2021 रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मे 2021 रोजी संपत आहे. त्यामुळे, विधानसभेचा कार्यकाळ संपन्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 294, आसाममध्ये 126, तामिळनाडू 234,  केरळ 140 आणि पद्दुचेरीत 30 जागांसाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. 

Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर

असा आहे पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रम : - 

तामिळनाडू विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात निवडणूक होणार- ६ एप्रिल रोजी मतदान

आसाममध्ये विधानसभा निवडणूक -

पहिला टप्पा - २७ मार्च मतदान

दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान

तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान

पदुच्चेरी विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिल रोजी मतदान

केरळ विधानसभा निवडणूक - एकाच टप्प्यात निवडणूक- ६ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक -

पहिला टप्पा - 27 मार्च मतदानदुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदानतिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदानचौथा टप्पा - 10 एप्रिल मतदानपाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदानसहावा टप्पा- 26 एप्रिल मतदानसातवा टप्पा- २६ एप्रिल मतदानआठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगwest bengalपश्चिम बंगालAssamआसामKeralaकेरळTamilnaduतामिळनाडू