शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

८३ ग्रा.पं.मध्ये १३९ पदांसाठी निवडणूक रणगाव येथे सार्वत्रिक निवडणूक : २५ पासून निवणुक प्रक्रिया सुरु

By admin | Updated: July 23, 2016 00:03 IST

जळगाव : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या रणगाव ता.रावेर या ग्रामपंचायतीसह ८३ ग्रामपंचायतींमधील १३९ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुक होत आहे. २५ पासून निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

जळगाव : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या रणगाव ता.रावेर या ग्रामपंचायतीसह ८३ ग्रामपंचायतींमधील १३९ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुक होत आहे. २५ पासून निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
८३ ग्रा.पं.मध्ये पोटनिवडणुक
जिल्हा प्रशासनातर्फे ८३ गावांमध्ये रिक्त असलेल्या १३९ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात जळगाव तालुका : विटनेर, आसोदा, फुपणी, कंडारी, सावखेडा. जामनेर : शेरी, लहासर, शहापूर, किन्ही, डोहरी. एरंडोल : धारागिर, टोळी खुर्द, ब्राšाणे. भुसावळ : कठोरा बुद्रुक, अंजनसोंडे, चोरवड, बेलव्हाय. यावल : म्हैसवाडी, बोरखेडा बुद्रुक, बोरावल बुद्रुक, शिरागड, विरोदा, भालशिव, न्हावी प्र.अ., पिळोदे खुर्द, बामणोद, नावरे, टाकरखेडा, पिंप्री. रावेर : रणगाव येथे सार्वत्रिक निवडणुक तर शिंगाडी, कांडवेल, नेहते, धुरखेडा, थोरगव्हाण, तासखेडा, मोरगाव खुर्द, दोधे, गहुखेडा, कोळोदे, पुनखेडा, पाडळे खुर्द, रायूपर, सहस्त्रलिंग, पुरी गोलवाडे, खानापूर, मस्कावद खुर्द, कुसुंबा बुद्रुक, भोकरी, मांगी/चुनवाडे येथे पोटनिवडणुक होणार आहे. चोपडा : धुपे बुद्रुक, गणपूर, अंबोडे, विचखेडा, अंजतीसिम. भडगाव : कनासी, अंजनविहिरे, कोळगाव, तांदुळवाडी, वाक, भ˜गाव, वडगाव बुद्रुक. पाचोरा : खडकदेवळा, टाकळी, डोकलखेडा, भोरटेक. चाळीसगाव : दसेगाव बुद्रुक, आडगाव, राजदेहरे. अमळनेर : सडावण बुद्रुक, जैतपीर, रुंधाटी, भिलाली, खेडी खुर्द, कळमसरे, कंडारी खुर्द, एकतास, धावडे, निमचारम, शिरूर, तांदळी, नगाव बुद्रुक, सुंदरप˜ी. बोदवड : करंजी. या गावांचा समावेश आहे.
२५ पासून निवडणुक प्रक्रिया
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २५ जुलैपासून प्रक्रिया सुरु झाली आहे. ३ ते ९ ऑगस्ट दरम्यान नामनिर्देशनपत्रे मागविण्यात येणार आहे. १० रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट रोजी अर्ज माघार होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.२४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.२६ रोजी मतमोजणीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. २९ ऑगस्ट रोजी निकाल प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख असणार आहे. निवडणुक लागू झालेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.