शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणूक रोख्यांची योजना म्हणजे फुसका बार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:39 IST

निवडणूक निधीसाठी केंद्र सरकारने अमलात आणलेली निवडणूक रोख्यांची योजना फुसका बार निघाली, अशी टीका माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली आहे. 

जयपूर : निवडणूक निधीसाठी केंद्र सरकारने अमलात आणलेली निवडणूक रोख्यांची योजना फुसका बार निघाली, अशी टीका माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुका लढविण्यासाठी काळा पैसा वापरू नये हा उद्देश सफल व्हायच्याऐवजी त्या गैरकृत्यासाठी ही योजनाच सहाय्यभूत ठरली असेही ते म्हणाले. नवीन चावला यांनी लिहिलेल्या ‘एव्हरी व्होट काऊंट्स : दी स्टोरी ऑफ इंडियाज इलेक्शन' या पुस्तकाचे शनिवारी जयपूर लिटरेचन फेस्टिवलमध्ये प्रकाशन झाले. त्यावेळी पत्रकार एन. राम यांनी त्यांची मुलाखत घेतली.त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नवीन चावला म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत असो किंवा नोटाबंदीसारखे निर्णय घेतलेले असो, देशात काळ््या पैशाचा महासागर कायमच आहे. त्यातून राजकीय पक्षांना होणारा पैशाचा पुरवठा अजूनही थांबलेला नाही. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी आयोगाचा वचक निर्माण केला. त्यामुळे निवडणूक आयोग इतका स्वतंत्र बाण्याने काम करू लागला की, निवडणुकांच्या तारखा ठरविताना कार्यकारी मंडळाशी चर्चा करण्याची गरज भासली नाही. निवडणूक खर्चाची घालून दिलेली मर्यादा नेहमीच ओलांडली गेली आहे. जनतेचा आवाज बनण्याऐवजी राजकारणी संसदेच्या माध्यमातून श्रीमंत व सामर्थ्यशाली होण्याचा प्रयत्न करत आहेत. असे होणे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. निवडणुकांतील गैरप्रकार थांबायलाच हवेत, असेही चावला म्हणाले.अंतिम निकाल येईपर्यंत ईव्हीएमवर विश्वास ठेवा२०१० ते २०१४ या कालावधीत देशात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च केले. त्यातील निम्मा पैसा बेहिशेबी होता, असे सेंटर फॉर मीडिया स्टडीजने म्हटले आहे.त्याबद्दल नवीन चावला म्हणाले की, ही अतिशय चिंताजनक स्थिती आहे. ईव्हीएम हे संगणकांना जोडले नाहीत, तर त्यांचे हॅकिंग होण्याची शक्यता उरणार नाही. या यंत्रांविरोधात प्रदीर्घ न्यायालयीन लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय आपला अंतिम निकाल देईपर्यंत ईव्हीएमवर तूर्त विश्वास ठेवायला हवा.

टॅग्स :Electionनिवडणूक