शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या गोपनीय ‘डाटा’ची चोरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 07:08 IST

लाखो रुपयांच्या मोबदल्यात मतदार चिठ्ठी तयार करण्याचा धंदा तेजीत

- श्याम बागुलनाशिक : बीएलओंनी घरोघरी जाऊन गोळा केलेल्या मतदारांच्या माहितीवर निवडणूक आयोगाचाच अधिकार आहे. ही माहिती गोपनीय दस्तावेज म्हणून गणला जात असताना प्रत्यक्षात यादी छपाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडूनच हा ‘डाटा’ लिक झाल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.डाटाच्या माध्यमातून राज्यात उमेदवार व राजकीय पक्षांना लाखो रुपयांच्या मोबदल्यात हव्या त्या मतदारांची माहिती तसेच मतदान चिठ्ठीची छपाई करून देण्याचा धंदा केला आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या संदर्भात पाठपुरावा करून हा प्रकार उघडकीस आणला आहे.नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांसाठी आयोगाने गुजरात इन्फोटेक व वसंत ट्रेडर्स कंपनीला मतदार यादी छपाईचा ठेका दिला आहे. या ठेकेदारांच्या चुकांकडे आजवर निवडणूक आयोगही दुर्लक्ष करीत आला आहे. निवडणूक यंत्रणेला ठेकेदाराकडून ‘मधाचे बोट’ लावले जात असल्याने त्यांनीही कायम त्यांच्यावर मेहेरनजरच केली आहे. परिणामी ठेकेदाराकडील मतदारांच्या माहितीला पाय फुटले आहेत.

राज्यातील सर्व मतदारसंघातील मतदारांची माहिती ‘राजेश’ नामक व्यक्तीकडे असून, त्याने मतदारांच्या माहितीच्या आधारे राजकीय पक्ष व उमेदवारांना मतदान चिठ्ठी छापून देण्यापासून विशिष्ट मतदारांची माहिती लाखो रुपयांच्या मोबदल्यात उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय थाटला आहे.प्रस्तुत प्रतिनिधीने गुजरात इन्फोटेकचे ‘रोहित’ नामक व्यक्तीशी संपर्क साधला असता, त्याने आपण हे काम करीत नाही, परंतु आपल्या मित्राकडे सारी माहिती असल्याचे सांगत ‘राजेश’ नामक व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. ‘राजेश’शी संपर्क साधला असता, त्याने एका झटक्यात मतदार चिठ्ठी छापून देण्याची तयारी दर्शविली. मतदारसंघ क्रमांक किती? किती मतदार चिठ्ठी हवी? अशी विचारणा करून त्याला नाशिक मतदारसंघाचे नाव सांगितल्यावर त्याने सेकंदाचा उशीर न करता, नाशिक लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघांची नावे पटापट सांगून टाकले.ऑर्डर दिल्यास ३६ तासांनंतर ते छापून मिळतील, सध्या कामे खूप असल्यामुळे तुम्हाला घरपोच डिलेव्हरी मिळणार नाही, त्यासाठी मुंबईच्या अंधेरी येथून डिलेव्हरी घेऊन जावे लागणार असल्याचे सांगितले. अठरा लाख मतदार चिठ्ठी छपाईसाठी प्रती चिठ्ठी ३५ पैसे याप्रमाणे सहा लाख ३० हजार रुपये लागतील, असे सांगून त्याने मतदार चिठ्ठी कलर हवी की ब्लॅक व्हाइट अशी विचारणा केली. पुराव्या दाखल त्याने मुंबईतील उमेदवारांसाठी केलेल्या मतदार चिठ्याही प्रस्तुत प्रतिनिधीला पाठविल्या.गोपनीय कराराचा भंगमतदारांची माहिती असलेला ‘डाटा’ मतदार यादी छपाईसाठी ठेकेदाराला सुपुर्द करताना निवडणूक यंत्रणेकडून संंबंधित ठेकेदाराशी करार केला जातो. त्याने संबंधित माहितीचा गैरवापर करू नये, तसेच छपाईनंतर डाटा नष्ट करणे किंवा यंत्रणेला पुन्हा सुपुर्द करणे बंधनकारक असते. ठेकेदाराने कराराचे पालन केले, तर खासगी व्यक्तीकडे ही माहिती जाण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग