रेल्वे व बस प्रवाशांकरिता जागरुकता मोहीम निवडणूक आयोगाचा उपक्रम
By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST
नवी दिल्ली- येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता व उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने निवडणूक आयोगाने दिल्लीतील मेट्रो रेल्वे व डीटीसी बस प्रवाशांकरिता जागरूकता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.
रेल्वे व बस प्रवाशांकरिता जागरुकता मोहीम निवडणूक आयोगाचा उपक्रम
नवी दिल्ली- येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता व उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने निवडणूक आयोगाने दिल्लीतील मेट्रो रेल्वे व डीटीसी बस प्रवाशांकरिता जागरूकता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. दिल्ली मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयातर्फे शनिवारपासून दिल्लीतील सर्व मेट्रो स्टेशन्स, मेट्रो रेल्वेगाड्या व दिल्ली परिवहन मंडलाच्या बसेसमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रभूषण कुमार यांनी, या दोन्ही प्रवास माध्यमांद्वारे लाखो नागरिक दररोज प्रवास करतात. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हे एक मोठे व प्रभावी माध्यम आहे. सर्व मेट्रो स्टेशन्सवर सार्वजनिक घोषणांद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. तसेच बसमध्ये जागरुकता मोहीम राबविली जाणार आहे जेणेकरून नागरिक जास्तीतजास्त संख्येने मतदान करतील अशी माहिती पुढे दिली.