शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांना राजीनामा देण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:07 IST

वादग्रस्त निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांना पद सोडण्यास सांगण्यात आल्याचा निरोप दिला गेल्याचे समजते.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : वादग्रस्त निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांना पद सोडण्यास सांगण्यात आल्याचा निरोप दिला गेल्याचे समजते. सरकारमधील अति उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवासा यांना त्यांनी घटनात्मक पदाचा राजीनामा द्यावा, असे औपचारिकरीत्या सांगण्यात आले आहे. दहा मुख्य कंपन्यांच्या संचालक मंडळावर अशोक लवासा यांची पत्नी नोव्हेल लवासा यांची नियुक्ती झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर योग्य ती चौकशी करण्याची सरकारची इच्छा आहे. लवासा हे सरकारमध्ये संवेदनशील पदांवर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या पत्नीला कंपन्यांच्या मंडळावर घेण्यात आले होते.ऑगस्ट २०१४ मध्ये अशोक लवासा यांना ऊर्जा सचिव हे महत्त्वाचे पद दिले गेल्यानंतर मोदी सरकारने त्यांना एकामागून एक महत्त्वाची पदे दिली. नंतर ते पर्यावरण सचिव होते, तर २०१६ मध्ये त्यांना अर्थ सचिवाची जबाबदारी दिली गेली. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेवानिवृत्तीनंतर लवासा यांना त्यांच्या आतापर्यंतच्या सेवांची बक्षिसी जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक आयुक्तपद देऊन दिली गेली.लवासा यांचे सरकारशी संबंध असेच मधुर राहिले असते, तर ते एप्रिल २०२१ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त बनले असते; परंतु त्यांच्या पत्नीचा संबंध असलेल्या हितसंबंधांचा संघर्ष आणि औचित्यभंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर अशोक लवासा यांना हव्याशा पदावर कायम ठेवण्याची सरकारची इच्छा नाही.यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व इतर सहकाऱ्यांशी मतभेद व्यक्त करून खळबळ निर्माण केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या झालेल्या आरोपावरून लवासा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी मतभेद व्यक्त केले होते.नोव्हेल लवासा या स्टेट बँक आॅफ इंडियातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि ल्युटेन्स दिल्लीत एक चित्रकार एवढीच त्यांची ओळख असताना कंपन्यांनी त्यांच्यात एवढा रस का दाखवला याचा तपशील सरकारला माहीत करून घ्यायचा आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीची चौकशी करता येत नसल्यामुळे चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अशोक लवासा यांना पदाचा राजीनामा देण्याचा निरोप दिला गेला आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग