शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या ठिकाणचा खर्च उमेदवाराकडून घ्या, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:26 IST

लोकसभा वा विधानसभेची निवडणूक दोन मतदारसंघांतून लढविणारा उमेदवार दोन्ही ठिकाणी निवडून आल्यास, एका पोटनिवडणुकीचा खर्च त्या उमेदवाराकडून घेण्याची तरतूद कायद्यात केली जावी, अशी भूमिका निवडणूक आयोगाने

नवी दिल्ली - लोकसभा वा विधानसभेची निवडणूक दोन मतदारसंघांतून लढविणारा उमेदवार दोन्ही ठिकाणी निवडून आल्यास, एका पोटनिवडणुकीचा खर्च त्या उमेदवाराकडून घेण्याची तरतूद कायद्यात केली जावी, अशी भूमिका निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कोणीही व्यक्ती लोकसभा किंवा विधानसभेत एकाच वेळी एकाहून अधिक मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. असे असले तरी या कायद्याच्या कलम ३३(७)मध्ये उमेदवारांना दोन मतदारसंघांतून एकाच वेळी निवडणूक लढविण्याची मुभा दिलेली आहे. परिणामी, दोन ठिकाणांहून निवडून आले तरी अशा उमेदवारास त्यापैकी एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीनंतर काही महिन्यांतच अशा मतदारसंघांत पोटनिवडणूक घ्यावी लागते.भाजपाचे नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी या कलम ३३(७)च्या वैधतेस आव्हान देणारी जनहित याचिका केली आहे. हे कलम रद्द करावे आणि उमेदवाराला फक्त एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे बंधन घालावे, अशी त्यांची विनंती आहे. सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने वरीलप्रमाणे भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र बुधवारी सादर केले. त्यावर विचार करून उत्तर देण्यासाठी सरकारने वेळ मागितल्याने पुढील सुनावणी जुलैमध्ये ठेवली गेली.आयोगाने न्यायालयास सांंगितले की, खरेतर गेली १५ वर्षे आमचीही हीच भूमिका आहे. आम्ही जेव्हाजेव्हा निवडणूक सुधारणांचे प्रस्ताव सरकारकडे पाठविले तेव्हातेव्हा त्यात हा मुद्दाही होता. त्यापैकी एका वेळी या विषयावर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली व कायद्यातील तरतूद आहे तशीच कायम ठेवावी, असे मत पडले.आम्हीच केली होती सूचनाआयोग म्हणतो की, दोन मतदारसंघांतून एकच उमेदवार विजयी झाल्याने घ्याव्या लागणाºया पोटनिवडणुकीच्या खर्चापोटी ठरावीक रक्कम त्या उमेदवाराने आधीच जमा करण्याची सूचना आम्ही केली होती. त्या वेळी आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी पाच लाख रुपये व लोकसभा निवडणुकीसाठी १० लाख रुपये अशी रक्कम सुचविली होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय