शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार, आयोगाची आज पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 11:51 IST

लोकसभेचं वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे.

ठळक मुद्देलोकसभेचं वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.आजच निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल, असे दिसून येते. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू होईल.

नवी दिल्ली - लोकसभेचं वेळापत्रक आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या मंत्र्यांना सर्वच विकासकामांची उद्धाटने 8 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे बजावले होते. त्यामुळे 9 मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे आजच निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाईल, असे दिसून येते. आयोगाने निवडणुकांची घोषणा  करताच आचारसंहिता लागू होईल. दरम्यान, आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे देशाचे लक्ष लागले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबतचे चित्र स्पष्ट झाले होते. तसेच इव्हीएमवर घेण्यात येणाऱ्या शंकांबाबतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ''आम्ही जाणते अजाणतेपणी इव्हीएमचा फुटबॉल बनवला आहे. निकाल मनासारखे लागले तर ईव्हीएम चांगल्या आणि निकाल विरोधात गेले तर इव्हीएम खराब असे आरोप केले जातात.'' असे ते म्हणाले होते.

भारतीय जवानांचे फोटो प्रचारात वापरू नका; निवडणूक आयोगाची सक्त ताकीद

भारतीय हवाई दलाने केलेला एअर सर्जिकल स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, पुलवामा हल्ला अशा घटनांचा वापर हा स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टर्सवर केला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्षाने आपली कंबर कसली आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूकप्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. शनिवारी (9 मार्च) निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकीद निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. 

भारतीय हवाई दलाने केलेला एअर सर्जिकल स्ट्राईक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, पुलवामा हल्ला अशा घटनांचा वापर हा स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी पोस्टर्सवर केला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्षाने आपली कंबर कसली आहे. मात्र कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूकप्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. शनिवारी (9 मार्च) निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकीद निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूक