शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१२ राज्यातील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा, MP, UPमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला

By बाळकृष्ण परब | Updated: September 29, 2020 17:21 IST

देशातील १२ राज्यांमधील विधानसभांच्या ५६ जागांसाठी आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे

ठळक मुद्दे१२ राज्यांमधील विधानसभांच्या ५६ जागांसाठी आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा मध्य प्रदेशमधील सर्वाधिक २७ विधानसभा मतदारसंघात तर उत्तर प्रदेशमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगालमधील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय

नवी दिल्ली - भारतीय निवडणूक आयोगनाचे आज देशातील १२ राज्यांमधील विधानसभांच्या ५६ जागांसाठी आणि लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशमधील सर्वाधिक २७ विधानसभा मतदारसंघात तर उत्तर प्रदेशमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. तर केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगालमधील सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील एक लोकसभा मतदारसंघ आणि मणिपूरमधील २ विधानसभा मतदारसंघांमध्ये ७ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, नागालँड, ओदिशा, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेशमधील मिळून ५३ विधानसभा मतदारसंघामध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व मतदारसंघातील मतमोजणी ही १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी केलेल्या विनंतीवरून तेथील पोटनिवडणूक टाळण्यात आली आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील स्वार मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत अद्याप कुठलीही घोषणा निवडणूक आयोगाने केलेली नाही.मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याने मार्च महिन्यात कमलनाथ सरकार कोसळले होते. तर भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर अजून तीन आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारला होते. त्यामुळे रिक्त झालेल्या एकूण २७ मतदारसंघांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्येदेखील पोटनिवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्या सात मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे त्यापैकी सहा मतदारसंघात भाजपाचे आमदार होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेश