शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारात पाण्यासारखा पैसा वाहणार, भारत अमेरिकेलाही मागे टाकणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:28 IST

भारतातल्या राजकीय पक्षांना कोणत्या सरळ मार्गानं कधीही निधी मिळत नाही. परंतु पार्टी चालवण्यासाठी आणि निवडणुका लढण्यासाठी दुस-या पद्धतीनंही मदत मिळत असते.

नवी दिल्ली- भारतातल्या राजकीय पक्षांना कोणत्या सरळ मार्गानं कधीही निधी मिळत नाही. परंतु पार्टी चालवण्यासाठी आणि निवडणुका लढण्यासाठी राजकीय पक्षांना दुस-या पद्धतीनंही मदत मिळत असते. अनेक पक्षांच्या कार्यालयात हा निधी येत असतो. राजकारण्यांना करातून सूट मिळते. तर काही अटींवर दिलेल्या देणगीतही कराची सूट दिली जाते. तो पैसा ते निवडणुकीत प्रचारादरम्यान वापरतात.सेंटर फॉर मीडिया स्टडिजच्या अहवालानुसार, भारतात 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या कॅम्पेनिंगसाठी जवळपास 5 अब्ज डॉलर म्हणजेच 33 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला होता, जो अमेरिकेमध्ये 2012च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगसाठी करण्यात आलेल्या खर्चापेक्षा जास्त आहे. ज्यात 4 अब्ज डॉलर म्हणजेच 27 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अमेरिकेनं 2016च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगसाठी 6.8 अब्ज डॉलर म्हणजे 44 हजार कोटी रुपये खर्च केले होते. त्यामुळेच भारत 2019च्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होणा-या खर्चापेक्षा जास्त खर्च करणार आहे.निवडणूक आयोगानं दिलेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीतील खर्चानुसार भाजपानं निवडून येण्यासाठी 714 कोटी रुपये खर्च केला आहे. तर काँग्रेसनं 516 कोटी रुपये खर्च केले होते. राष्ट्रवादीनं 51 कोटी रुपये खर्च केले होते. तर बीएसपीनं 30 कोटी रुपये निवडणुकांवर उधळले होते. सीपीएमनं 19 कोटी रुपये खर्च केले होते. नियमानुसार राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या खर्चाचा तपशील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर 75 दिवसांत देणं गरजेचं आहे. तर लोकसभा निवडणुकीत 90 दिवसांच्या आत देणं आवश्यक असतं. परंतु या खर्चाचा अद्याप तपशील न दिल्यानं निवडणूक आयोगानं जवळपास 20 राजकीय पक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. कारण त्या पक्षांनी निवडणुकीवर केलेल्या खर्चाची तपशीलवार माहिती दिलेली नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पElectionनिवडणूक