लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतून राज्यसभेवर पाठवायच्या १० सदस्यांची निवड करण्यासाठी, येत्या ८ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक घेण्याचा आधी जाहीर केलेला कार्यक्रम निवडणूक आयोगाने सोमवारी अचानक रद्द केला.गोव्यातील एक राज्यसभा सदस्य येत्या २८ जुलै रोजी, तर गुजरातचे तीन व प. बंगालचे सहा राज्यसभा सदस्य येत्या १८ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिकाम्या होणाऱ्या जागा भरण्यासाठी ८ जूनला मतदान घेण्याचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने १६ मे रोजी जाहीर केला होता. त्यानुसार, आज २२ मे रोजी या निवडणुकांची अधिसूचना जारी व्हायची होती, परंतु त्या आधीच आयोगाने आधीचा कार्यक्रम जाहीर करणारे प्रसिद्धी पत्रक मागे घेतले.हा नवा निर्णय घेण्याचे कोणतेही कारण आयोगाने दिलेले नाही. मात्र, नवा निवडणूक कार्यक्रम यथावकाश जाहीर केला जाईल, असे आयोगाने म्हटले.
राज्यसभेच्या १० जागांची निवडणूक ऐन वेळी रद्द
By admin | Updated: May 23, 2017 03:52 IST