ज्येष्ठांचा आगळा - वेगळा व्हॅलेंटाइन डे
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार हाडांची झीज होऊन सांधेदुखीसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. नव्याने झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळे वृद्धांमध्ये उद्भवणार्या या त्रासाला बाजूला सारून त्यांचे जीवन अधिक सुखकर करता येते. व्हॅलेंटाइन डे निमित्त शानिवारी वोखार्ट हॉस्पिटलमध्ये अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र पाटील यांनी सांधे आणि गुडघ्यांचे प्रत्यारोपण झालेल्या २० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी सांधेदुखी आणि आणि संधिवाताच्या समस्यांवर मार्गदर्शन केले.
ज्येष्ठांचा आगळा - वेगळा व्हॅलेंटाइन डे
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार हाडांची झीज होऊन सांधेदुखीसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. नव्याने झालेल्या वैद्यकीय प्रगतीमुळे वृद्धांमध्ये उद्भवणार्या या त्रासाला बाजूला सारून त्यांचे जीवन अधिक सुखकर करता येते. व्हॅलेंटाइन डे निमित्त शानिवारी वोखार्ट हॉस्पिटलमध्ये अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र पाटील यांनी सांधे आणि गुडघ्यांचे प्रत्यारोपण झालेल्या २० ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी सांधेदुखी आणि आणि संधिवाताच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जोडीदारासोबत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. सांधे आणि गुडघ्यांचे यशस्वीपणे प्रत्यारोपण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना इथल्या डॉक्टर्सचे आभार मानले. तरुणपणी राहून गेलेल्या गोष्टीही आता तेवढ्याच उत्साहात करता येतात आणि सामाजिक कार्यातही उत्स्फूर्तपणे सहभागी होता येते, असे वक्तव्य तिथे उपस्थित नागरिकांनी केले. यावेळी या हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉ. मेहेल कालावाडीया उपस्थित होते.(प्रतिनिधी)-----