शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: हरिश साळवेंचा मास्टरस्ट्रोक! ठाकरेंच्या 'त्या' युक्तिवादावर उपस्थित केले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 12:34 IST

सभागृहाला डावलून राज्यपालांनी बहुमत चाचणी करायला लावली असा युक्तिवाद ठाकरे गटाने कोर्टात मांडला होता.

नवी दिल्ली - सत्ताधारी मुख्यमंत्र्यांवर आमदारांच्या मोठ्या गटाचा अविश्वास असेल तर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश देणे यात चुकीचे काहीच नाही. शिवसेनेच्या आमदारांनी जे पाऊल उचलले त्याला बंड म्हणता येणार नाही तर तो मतभेद व्यक्त करण्याचा प्रकार होता. आमदार झालं म्हणजे मत व्यक्त करू नये हे लोकशाहीत कुठेही नाही. उद्धव ठाकरेंसोबत अनेक आमदारांचे मतभेद होते असं सांगत पक्षांतरबंदीतील कलमांचा यावर परिणाम होणार नाही याप्रकारे युक्तिवाद शिंदेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात मांडले. 

सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर आज सुनावणी सुरू आहे. त्याठिकाणी आज शिंदे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे म्हणाले की, ही शिवसेनेतील फूट नव्हे तर मतभेद आहेत. पक्षांतरबंदी कायद्यात कुठेही लोकशाहीनुसार पक्षाच्या आतमध्ये आवाज उठवण्याची तरतूद ठेवणार आहे की नाही. १ तृतीयांश बहुमताची अट आधी होती. आता जर ती अट नसेल तर कुठल्याही पद्धतीने लोकशाहीचा आवाज त्यात नसावा ही चांगली गोष्ट नाही. शिंदे गटाची कारवाई पक्षाच्याविरोधात कृत्य नाही. पक्षाच्या अंतर्गत बाब आहे असं त्यांनी म्हटलं. 

तर सभागृहाला डावलून राज्यपालांनी बहुमत चाचणी करायला लावली असा युक्तिवाद ठाकरे गटाने कोर्टात मांडला. त्यावर राज्यपालांचा अधिकार कोर्टाने कर्नाटक प्रकरणी मान्य केला होता. तत्कालीन विधानसभा उपाध्यांनी १५ दिवसांची नोटीस देणे गरजेचे असताना त्याठिकाणी २ दिवसांची मुदत दिली. अध्यक्ष नसताना कुठलाही मोठा निर्णय घेणे अपेक्षित नाही. १० व्या सूचीनुसार, शिवसेनेत कुठलीही फूट नाही. मतभेद होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर आमदार नाराज होते. आमदार झाले म्हणून मत व्यक्त करण्याचा अधिकार गमावत नाही असा युक्तिवाद हरिश साळवेंनी कोर्टात मांडला. 

राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्याचे अधिकारएखादा मोठा गट मुख्यमंत्र्यांवर नाराज असेल तर त्याबद्दल बहुमत चाचणी घेण्याचे अधिकार राज्यपालांकडे आहेत. त्यात गैर काही नाही असंही हरिश साळवे यांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान, निवडणूक आयोगासह ज्या घटनात्मक संस्था आहे त्या सर्व यंत्रणेला बायपास करून परिस्थिती पूर्ववत करायला सांगितली जाते. प्रतोद बदलण्याची माहिती गटनेत्यांकडूनच दिली जाते. अध्यक्षांशी संपर्कात राहणे गटनेत्याचे कर्तव्य असा युक्तिवाद शिंदे गटाच्या नीरज किशन कौल यांनी मांडला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय