शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 19:22 IST

महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? याचा विचार करा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

दिल्ली - मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पडणार आहे, हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत ते सरकारमध्ये राहतील. धमकीला कुणी घाबरत नाही. जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं मी पाहतो असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडून आलेले तुमच्या आमदारांना विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर ही आघाडी कधीच झाली नसती. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. ही आघाडी फारकाळ टिकणार नाही. केवळ सत्तास्थापनेसाठी ही आघाडी झाली. भाजपा-शिवसेना आमदारांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी होते. त्यामुळे आमदार, खासदारांना निर्णय घ्यावाच लागणार होता अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर दिली आहे. 

तसेच महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? त्यांना विचारात घेतले असते तर ही आघाडी आणि बंडखोरी झालीच नसती. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्ती शिवरायांच्या विचाराची वारस आहे. परकीय आक्रमणाला कुणी भीक घातली नाही. कुणीतरी फुटकळ बेताल वक्तव्य करतायेत ते धमक्यांची भाषा करत असतील त्याला भीक घालणार नाही. जे कुणी धमकी देत आहेत त्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात उदयनराजे यांनी शिंदे यांना धमकी देणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

हा तर रडीचा डाव - एकनाथ शिंदेजे अल्पमतात त्यांनी नोटीस पाठवणं म्हणजे रडीचा डाव अशा शब्दात बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी  शिवसेनेला टोला लगावला आहे. शिंदे गटाची बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. काही अपक्ष आमदारही आहेत. पुढची रणनीती बैठकीत ठरेल. बैठकीनंतर पुढचे सर्व निर्णय घेतले जातील. लोकशाहीत कायद्याला, घटनेला आणि नियमाला महत्त्व आहे. जे अल्पमतात आहेत त्यांनी अशाप्रकारे नोटिसा पाठवणे हे हास्यास्पद आहे. रडीचा डाव आहे. अपात्र करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. कायद्यानुसार ते शक्य नाही असा टोला शिंदेंनी लगावला आहे. 

तसेच आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर रणनीती ठरवू. नियमानुसार लोकशाहीनुसार पावले उचलली जातील. कितीही नोटीस पाठवल्या तरीही घाबरणार नाही. घाबरतंय कोण? विधानसभेत ज्या नियमानुसार गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतील. गटनेते नेमले आहेत ते पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे ४० हून जास्त आणि १२ अपक्ष अशाप्रकारे संख्याबळ ५० आमदारांच्या पुढे गेले आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे