शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एक देश एक निवडणूक विधेयकावर संसदीय समितीची बैठक, कायदेतज्ज्ञांनी दिल्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:51 IST

One Nation One Election : आतापर्यंत समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत.

One Nation One Election : नवी दिल्ली : एक देश-एक निवडणूक दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) तिसरी बैठक मंगळवारी संसद भवनात पार पडली. या बैठकीत माजी सरन्यायाधीश उदय उमेश ललित, माजी कायदा आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी आणि चार कायदेतज्ज्ञांनी समितीला सूचना दिल्या. दरम्यान, आतापर्यंत समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत.

संसदेत सादर करण्यात आलेल्या १२९ व्या संविधान दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी आणि सूचना घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ३९ सदस्यीय जेपीसी स्थापन करण्यात आली आहे. जेपीसीचे काम विधेयकावर व्यापक चर्चा करणे, विविध भागधारक आणि तज्ञांशी चर्चा करणे आणि सरकारला त्यांच्या शिफारसी देणे आहे. 

एक देश एक निवडणूक विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या बैठकीत मंगळवारी कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष ऋतुराज अवस्थी यांच्यासह आयएएस अधिकारी नितेन चंद्रा हे देखील हजर होते. नितेन चंद्रा हे एक देश एक निवडणूक यावर सहमती बनविण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या समितीचे सचिव देखील होते. 

याचबरोबर, भारताचे माजी सरन्यायाधीश यूयू ललित हे देखील संसदीय समितीसमोर आपले मत व्यक्त करणार आहेत. तसेच, २०१५ मध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने संसदीय समितीचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ वकील आणि माजी काँग्रेस खासदार ई.एम. सुदर्शन नचियप्पन देखील समितीसमोर आपले विचार मांडतील.

पहिली बैठक ८ जानेवारीला झाली होतीदरम्यान, जेपीसीची पहिली बैठक ८ जानेवारी २०२५ रोजी झाली होती. यामध्ये सर्व खासदारांना १८ हजारांहून अधिक पानांचा अहवाल देण्यात आला होता. त्यात कोविंद समितीचा अहवाल आणि त्याची सॉफ्ट कॉपी हिंदी आणि इंग्रजीमध्ये होती. दुरुस्ती विधेयकावरील दुसरी बैठक ३१ जानेवारी २०२५ रोजी झाली होती. यामध्ये समितीने विधेयकावर सूचना घेण्यासाठी स्टेक होल्डर्सची यादी तयार केली होती. यात सर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायाधीश, निवडणूक आयोग, राजकीय पक्ष आणि राज्य सरकारे सहभागी झाली होती.

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन